अनेक जण हल्ली प्रसिद्धी मिळविण्यासाठी किंवा रिल्स काढून लाईक्स मिळविण्यासाठी ट्रेनच्या जवळ व्हिडीओ रिल्स बनवतात. काही लोकांचा तर रिल्स बनविताना रेल्वेने जर धडक दिल्याने काहींना आपल्या प्राणास गमवावे लागले आहे. तर काहींना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे. एक अशाच पद्धतीचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे की ज्यात रेल्वे रुळांवर एक व्यक्ती आरामात झोपल्याचे दिसत आहे. त्याला पाहून लोको पायलटने ट्रेन थांबविली आणि त्याला रुळांवर झोपलेल्या व्यक्तीच्या जवळ जाऊन त्याला उठविले…
हा ताजा व्हिडीओ प्रयागराज येथील असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती रेल्वे ट्रॅकवर पहुडलेला आहे.त्याला पाहून असे वाटत आहे की तो झोपलेला आहे. दरम्यान त्या वेळेत येथे ट्रेन येते. ट्रेनचा वेग कमी होता. त्यामुळे ट्रेनच्या लोको पायलटने ट्रेन वेळीच थांबविली. हॉर्न वाजवूनही ही व्यक्ती काही रुळांवरुन उठली नाही. तेव्हा लोको पायलटच ट्रेनच्या केबिनमधून उतरुन त्या व्यक्तीपर्यंत गेला आणि त्याला उठविले…
Man Sleep on Railway Track here see the post –
A person was sleeping on the railway track with an umbrella. Seeing this, the loco pilot stopped the train, Then he woke him up and removed him from the track. Then the train moved forward in Prayagraj UP
pic.twitter.com/OKzOpHJeih— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) August 25, 2024
28 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये लोको पायलटला जेव्हा ट्रॅकवर कोणीतरी छत्री घेऊन झोपल्याचे दिसते. तेव्हा त्या व्यक्तीजवळ लोको पायलट जाऊन उभा राहिल्याचे व्हिडीओत दिसत आहे.मात्र. यानंतर नेमके काय झाले ते कळालेले नाही. रुळांवरील संबंधित ती व्यक्ती बरी असून त्याला तेथून हटविण्यात आल्याचे सांगण्यात येते. यानंतर ट्रेन पुढील प्रवासासाठी निघून गेली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यावर अनेक युजरच्या कमेंट येत आहेत.
या व्यक्तीने देशी दारु प्यायली असावी त्याचाच परिणाम दिसत आहे.पटरीला उशी मानून हा आरामात झोपला कसा ? अशी प्रतिक्रीया एका युजरने व्यक्त केली आहे. या बहाण्याने लोको पायलटला देखील रिल्स बनविण्याची संधी मिळाली अशी प्रतिक्रीया अन्य एका युजरने व्यक्त केली आहे. तर अशाच कारणांनी ट्रेन लेट होत असतात आणि आपण रेल्वेच्या नावाने ओरडत असतात अशी प्रतिक्रीया दुसऱ्या एका युजरने दिली आहे. तर या प्रकरणाची चौकशी झाली पाहीजे. हा व्यक्ती येथे का झोपला. याच्यावर कारवाई व्हायला हवी अशी मागणी एका युजरने केलेली आहे. कदाचित त्याला झोपतेच आत्महत्या करायची असेल, अखेर कोण अशा प्रकारे रेल्वे रुळांवर झोपेल असेल अशी प्रतिक्रीया एका युजरने व्यक्त केली आहे.जर ही व्यक्ती नशेत असली तरी त्याच्यावर कारवाई व्हायला हवी अशी मागणी सोशल मिडीयावर होत आहे.