Presence of mind : कोणतेही काम करताना आपण आपल्या डोक्याचा वापर करणे खूप महत्त्वाचे असते. कारण ते काम योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते. मेंदू नसेल तर माणूस आणि प्राणी यात काय फरक राहणार? मेंदूच्या योग्य वापरानेच माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा बनला आहे. असे म्हणतात, की मानव हा देखील पहिला प्राणी होता, म्हणजेच माकडांना मानवाचे पूर्वज मानले जाते आणि हळूहळू त्यांचा विकास मेंदूच्या वापराने होत गेला आणि आज त्याचा परिणाम आपल्या समोर आहे, की आपण काय आहोत. आता मानवाने इतकी प्रगती केली आहे की कोणतेही काम अशक्य वाटत नाही. सध्या सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडिओ (Video) खूप व्हायरल (Video) होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या डोक्याचा पुरेपूर वापर करतो. आपल्याजवळ असलेल्या संसाधनांचा पुरेपूर वापर करतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती पुढे जाण्याचा मार्ग शोधत आहे. त्यासाठी तो अशी युक्ती शोधतो, की तुम्ही अशी आयडिया कधी पाहिली नसेल.
एक व्यक्ती रस्त्याने जात आहे. पण त्याच्यासमोर पाणी दिसत आहे आणि त्याला पाण्यात उतरायचे नाही, कारण त्याचे बूट ओले होणार आहेत. म्हणून त्याने त्याच्याकडे असलेल्या संसाधनाचा वापर केला आणि त्याद्वारे पाण्यात मार्ग काढत पुढे गेला. त्याच्या प्रेसेंझ ऑफ माइंड आणि संसाधनांचा योग्य वापर यासाठी लोक त्याचे खूप कौतुक करत आहेत.
Presence of mind & best utilization of resource. pic.twitter.com/UySHfo6m1z
— Dipanshu Kabra (@ipskabra) March 15, 2022
हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला असून, ‘प्रेसेंझ ऑफ माइंड आणि संसाधनांचा सर्वोत्तम वापर’ असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. अवघ्या 16 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 5 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे.
हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूझरने लिहिले आहे, की जे लोक संसाधनांचा सर्वोत्तम वापर करतात ते नेहमीच यशस्वी होतात, ते जितक्या कौशल्याने वापरतात तितके ते अधिक यशस्वी होतात. शिक्षण आपल्याला संसाधनांचा कार्यक्षम वापर करायला शिकवते’, तर दुसर्या यूझरने गंमतीत लिहिले, की मुंबईतील पावसाळ्यासाठी हे एक उत्तम साधन आहे.