Jugaad Viral video : पैसे वाचवण्याची Ninja technique; यूझर्स म्हणतायत, ‘बादशहा’तलं ‘ते’ गाणं जरा जास्तच Seriously घेतलं

| Updated on: Feb 20, 2022 | 11:56 AM

Jugaad for auto fare saving : एक व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) होत आहे, जो पाहून तुम्ही हसाल आणि आश्चर्यचकीतही व्हाल. तुम्ही पाहिले असेल, की लोक पैसे (Money) वाचवण्यासाठी अनेकदा खचाखच भरलेल्या ऑटोमध्ये प्रवास करतात, असाच हा व्हिडिओ आहे.

Jugaad Viral video : पैसे वाचवण्याची Ninja technique; यूझर्स म्हणतायत, बादशहातलं ते गाणं जरा जास्तच Seriously घेतलं
पैसे वाचवण्यासाठी तरुणाचा जुगाड
Follow us on

Jugaad for auto fare saving : देशात एकापेक्षा एक प्रतिभावान आणि जुगाडू लोक राहतात. कोणतीही मोठी समस्या आल्यास ते चुटकीसरशी सोडवतात. यामुळेच सर्वांना माहीत आहे, की जुगाडच्या बाबतीत भारतीयांना तोड नाही. सोशल मीडियावर जुगाड व्हिडिओजचा अक्षरश: पाऊस कधीकधी पडलेला पाहायला मिळतो. जे पाहून अनेकवेळा आपल्याला प्रेरणा मिळते, आपण थक्कही होतो, मात्र सध्या एक व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) होत आहे, जो पाहून तुम्ही हसाल आणि आश्चर्यचकीतही व्हाल. तुम्ही पाहिले असेल, की लोक पैसे (Money) वाचवण्यासाठी अनेकदा खचाखच भरलेल्या ऑटोमध्ये प्रवास करतात, पण अनेकवेळा तुम्ही पाहिले असेल की काही दिग्गज ऑटोच्या मागे लटकून त्यांचे पैसे पूर्णपणे वाचवतात. अलीकडच्या काळातही अशाच एका महाशयाचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात एक माणूस पैसे वाचवण्यासाठी ऑटोच्या मागे लटकून प्रवास करत आहे.

ऑटोवर पकड

व्हिडिओमध्ये दिसत आहे, की एक व्यक्ती पैसे वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि ऑटोच्या पाठीमागे लटकत प्रवास करत आहे. स्पायडर भिंतीला चिकटल्यासारखा मुलगा ऑटोला चिकटला आहे. या ऑटोवर त्याने ज्या पद्धतीने पकड ठेवली आहे ते खरोखरच लोकांना आश्चर्यचकित करणारे आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर

memecentral.teb नावाच्या अकाऊंटने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओला हजारो लाइक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. एका यूझरने लिहिले, की हा व्यक्ती माउंटन ड्यू प्यायले असावे, तर दुसऱ्या यूझरने लिहिले, ‘ऑटो पैसे वाचवण्यासाठी निन्जा तंत्र.’ दुसऱ्या यूझरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले, की बादशाह चित्रपटातील मरने से मैं कभी डरता नहीं हे गाणे गांभीर्याने घेत असावा. याशिवाय इतर अनेक यूझर्सनी या व्हिडिओवर मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा :

Viral Video : …म्हणून कधी चुकीचं काम करू नये, रस्त्यावरून भरकटलेल्यांना ‘या’ काकांनी दाखवला योग्य रस्ता

‘कोरोनानं लावलं जगाला वेड, त्याची सर्वांना लागण.. या सुरक्षेनं लावला वेळ, झालंबाबा एकदाचं लगन’, यासह ऐका भन्नाट Ukhane

Video viral : ‘याच्या’ हौसेला मोलच नाही! 1-1 रुपया जमवत अखेर खरेदी केली आपल्या स्वप्नातली स्कूटर