मुंबई : आपल्या देशात प्रत्येक मोसमात वेगवेगळी फळं (Fruit viral news) पाहायला मिळतात. त्याचबरोबर भारतातील लोकं सुध्दा त्या-त्यावेळी सीजनमध्ये ती फळं खात असतात. उन्हाळ्यात आंबे (mango viral news) खायला मिळतात, हिवाळ्यात द्राक्षे खायला मिळतात. आपल्या देशात प्राकृतिक विभागानुसार फळं पाहायला मिळतात. त्याचबरोबर देशात सगळीकडं ती फळं त्या-त्याकाळात उपलब्ध सुध्दा असतात. सध्या सोशल मीडियावर (trending news) एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका व्यक्तीने एकाचं झाडाला तीन वेगळी वेगळी फळं लागली आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. विशेष म्हणजे काही लोकांना या व्हिडीओबाबत शंका होती, परंतु हा व्हिडीओ खरा असल्याचा दावा एका हिंदी वेबपोर्टलने केला आहे.
तुम्ही ही टेक्निक वापरली, तर तुम्ही सुध्दा तुमच्या भागातल्या लोकांना धक्का देणार एवढं निश्चित. समजा तुम्हाला सुध्दा हा प्रयोग करायचा आहे, तर अजिबात अवघड असं नाही. सध्याची व्हायरल टेक्नॉलॉजी अगदी सोपी आहे. तुम्ही तु्मच्या गार्डनमध्ये सुध्दा ही पीकं घेऊ शकता. तुम्हाला सु्ध्दा हा प्रयोग करायचा असेल, तर व्हिडीओ समजून घ्यावा लागेल.
तुम्हाला सुध्दा अशा पध्दतीने गार्डन तयार करायचं असेल, तर तुम्ही करु शकता. त्याचबरोबर भाजी जरी तुम्हाला तुमच्या अंगणात घ्यायची असेल तरी घेऊ शकता. समजा तुम्हाला सुध्दा तुमच्या अंगणात आंब्याचं झाडं पाहिजे असेल, तर तुम्ही सुरुवातीला आंब्याच्या झाडाची फांदी घ्या, त्याचबरोबर केळी आणा आणि व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करा. काही दिवसात तुम्हाला सुध्दा एक वेगळेपण पाहायला मिळेल.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर Risky Garden नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. लावलेल्या रोपट्याची कशी काळजी घ्यावी, हे सुध्दा त्यांनी सांगितले आहे.