Bhajani Mandal : सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ (Video) व्हायरल होत असतात. कधी एखाद्या गाण्याच ट्रेंड (Trend) असतो. मग त्यावर रील बनवण्याची चढाओढ लागलेली असते. एखादे गाणे हीट झाले की त्यावर रील्स बनवल्या जातात. कधीकधी तर त्याचे भजनाचे व्हर्जनदेखील आपल्याला पाहायला मिळते. पण आपल्याकडे कोणतेही साधन नसताना फक्त आणि फक्त आवडच असेल तर? तरीही आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. असेच एक भजनी मंडळ सध्या व्हायरल (Viral) होत आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्याएवढ्या विविधतेचा देश जगाच्या पाठीवर शोधून सापडणार नाही. ही विविधता असूनही एकता आहे. हेच दर्शविणारा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. एका मराठी गीताचे गायन अमराठी मंडळाने गायले आहे, तेदेखील अत्यंत सुमधूर आवाजात. विश्वास बसणार नाही, मात्र व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला याची खात्री पटेल.
व्हिडिओमध्ये आपल्याला एक मंडळ दिसत आहे. यात काही महिला आणि पुरूष आहेत. समोर माइक नाही, रेकॉर्डिंगची अत्याधुनिक साधने नाहीत, स्टेज नाही, भलामोठा वाद्यांचा ताफा नाही, प्रकाशयोजना नाही, तरी सुमधूर! त्याहून अफाट म्हणजे चेन्नईतील हे भजनी मंडळ गदिमांनी लिहिलेले आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले मराठी भजन तालासुरात म्हणत आहेत! हे ऐकायला अत्यंत सुमधूर असून यूझर्संना या व्हिडिओने प्रभावित केले आहे. कानडा राजा पंढरीचा… हे गीत या मंडळाकडून ऐकताना एक वेगळाच भाव तयार झालाय.
हे अप्रतिम आहे!
माईक नाही, रेकाॅर्डिंगची अत्याधुनिक साधने नाहीत, स्टेज नाही, भलामोठा वाद्यांचा ताफा नाही, प्रकाशयोजना नाही,
तरी सुमधूर! त्याहून अफाट म्हणजे चेन्नईतील हे भजनी मंडळ गदिमांनी लिहिलेले आणि बाबूजींनी संगीतबद्ध केलेले मराठी भजन तालासुरात म्हणत आहेत!… ? pic.twitter.com/viYY3UhPZ3— Dr prashant bhamare (@dr_prashantsb) March 10, 2022
ट्विटरवर डॉ. प्रकाश भामरे यांनी ही व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. त्याला त्यांनी ‘हे अप्रतिम आहे!’ अशी कॅप्शन दिली आहे. सोबतच या मंडळाची थोडक्यात अशी माहिती दिली आहे. यूझर्सना हा व्हिडिओ आवडला असून ते लाइक, कमेंट्स आणि रिट्विट करत आहेत. काही तासांतच 2200हून अधिक व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले असून यात वाढ होत आहे.