Meerut Murder Case : तर सौरभाचा वाचला असता जीव?; AI ने दिले असे उत्तर की हादरले प्रशासन

| Updated on: Mar 21, 2025 | 3:52 PM

Meerut Murder Case AI : मेरठ येथील सौरभ राजपूतची हत्या त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराने केली. याप्रकरणी लोकांनी एआयला सौरभचा जीव वाचवता आला असता का? याविषयी विचारणा केली, त्याचे एआयने काय दिले उत्तर? या तरुणाचा वाचला असता जीव?

Meerut Murder Case : तर सौरभाचा वाचला असता जीव?; AI ने दिले असे उत्तर की हादरले प्रशासन
AI ने काय दिले उत्तर?
Image Credit source: गुगल
Follow us on

मेरठ येथील सौरभ राजपूत याच्या हत्येने अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला. त्याची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला या दोघांनी सुनियोजीतपणे त्याची हत्या केली. दोघे सातत्याने त्यांचा जबाब बदलत आहेत. त्यामुळे मनोविशेषज्ञ आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे. या दोघांनी अत्यंत क्रूरपणे सौरभची हत्या केली. AI -आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने सौरभ याचा जीव वचावता आला असता का? यावर काही जणांनी प्रश्न केला. त्यावर एआयने पण उत्तर दिले. विशेष म्हणजे साहिल आणि मुस्कान हे दोघे जादूटोणा, तंत्र-मंत्रावर विश्वास ठेवणारे होते. ते त्याविषयीचे प्रयोग करत होते. ही बाब तिचा नवरा सौरभ आणि मुस्कानच्या घरच्यांना सुद्धा माहिती होती. पण सौरभने केलेले दुर्लक्षच त्याच्या जीवावर बेतले.

एआयने काय दिले उत्तर?

AI ने उत्तर दिले की मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात उपलब्ध माहितीनुसार, त्याचे प्राण वाचले असते की नाही हे सांगणे अवघड आहे. कारण त्याची हत्या थंड डोक्याने आणि सुनियोजीत पद्धतीने करण्यात आली. सौरभच्या हत्येची तयारी तिने गेल्या वर्षी नोव्हेंबर 2024 मध्येच केली होती. त्यासाठी तिने मोठे चाकू खरेदी केले होते. हत्येनंतर सौरभचा मृतदेह कुठे दडवायचा हे सुद्धा तिने ठरवले होते.

हे सुद्धा वाचा

सौरभवर पहिला प्रयोग अयशस्वी झाल्यावर तिने संयमाने दुसर्‍यांदा त्याच्या जेवणात बेशुद्धीचे औषध टाकले. तो बेशुद्ध असताना त्याची हत्या केली. इतक्या सुनियोजीतपणे सर्व घटना घडत गेल्या की सौरभला त्याची जाणीव झालीच नाही. त्याला मुस्कानवर थोडा सुद्धा शक झाला नाही, असे उत्तर एआयने दिले. सौरभचे तिच्यावर अत्याधिक प्रेम म्हणा, विश्वास म्हणा यामुळे ती असं काही करेल, असा विचारही त्याच्या मनात आला नव्हता, हे स्पष्ट आहे.

पत्नीच्या अफेअरबद्दल नव्हती माहिती

सौरभ हा मर्चंट नेव्हीमध्ये होता. तो लंडन येथे होता. आपल्या पाठीमागे पत्नीचा कोणी प्रियकर आहे. त्याच्याशी तिचे संबंध आहे, हे कधी सौरभला कळलेच नाही. तो तर त्याच्या मुलीच्या वाढदिवसासाठी खास इतक्या दुरून आला होता. सौरभचे त्याच्या घराच्यांशी पटत नव्हते. त्याने त्यांचा विरोध पत्करून मुस्कानसोबत लग्न केले होते. तर सौरभ आपण जे सांगतो तेच ऐकतो, याची खात्री मुस्कानला होती. पण त्याच्या कुटुंबियांनी त्याला तिच्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता. पण मुस्कानवर त्याचे जीवापाड प्रेम होते. तिच्यावर विश्वास होता. त्यामुळे त्याने घरच्या मंडळींच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. जर त्याने माहिती काढली असती तर कदाचित तो आज जिवंत असता.