दिल्ली : दिल्ली मेट्रोमधील (Delhi Metro) अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही तरुण आणि तरुणींनी व्हिडीओ व्हायरल होण्यासाठी अनेक गोष्टी केल्या असल्याचं पाहायला मिळालं आहे. काही दिवसांपुर्वी दिल्ली मेट्रोमध्ये एक माकडं प्रवास करीत असल्याचं पाहायला मिळालं होत. त्यानंतर काही तरुणांनी मेट्रोमधून (trending video) मुलींचे कपडे घालून प्रवास केला होता. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती मेट्रोचे व्हिडीओ (metro viral video) पाहायला मिळत आहेत.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ दिल्ली मेट्रोचा असल्याचं एका वेबसाईटनं म्हटलं आहे. त्याचबरोबर मेट्रोमध्ये काही तरुण ग्रुपने प्रवास करीत आहेत. ज्यावेळी मेट्रोचा दरवाजा बंद होतो, त्यावेळी ते तरूण पाय अडकवून अडथळा निर्माण करीत आहेत. त्याचबरोबर मोठ्याने हसत आहेत. या व्हिडीओने अनेकांचं लक्ष खेचलं आहे. ट्विटरवरती हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून त्यावर विविध प्रकारच्या कमेंट येत आहेत. ही घटना करोल बाग मेट्रोवरती घडली आहे.
Ase logo ki wajhse metro (@OfficialDMRC) late hoti hai? pic.twitter.com/l7nopyU6UK
— Aman (@imb0yaman) June 8, 2023
हा व्हिडीओ आतापर्यंत 23 हजार लोकांनी पाहिला आहे. डीएमआरसी यांनी सुध्दा या व्हिडीओ प्रतिक्रिया दिली आहे. मेट्रोचा दरवाजा अशा पद्धतीने अडवणे कायद्याने गुन्हा आहे. समजा प्रवासी अशा पद्धतीच्या हरकती करत असतील तर डीएमआरसी हेल्पलाइन 155370 या नंबरवरती संपर्क साधावा. याच्या आगोदर सुध्दा दिल्लीच्या मेट्रोमध्ये अशा पद्धतीच्या अनेक घटना घडल्या आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी तरुण तरुणी कुठेही कशाही पद्धतीने व्हिडीओ तयार करीत आहेत. व्हिडीओ तयार करीत असताना अनेक तरुणांचा अपघात सुध्दा झाला आहे.