Mobile Cover Craft : क्रिएटिव्हीटी हा एक असा गुण आहे, जो सर्वांनाच आकर्षित करतो. प्रत्येकामध्ये काहीना काहीतरी गुण असतात. त्यातून जगावेगळे असे करता येवू शकते. सोशल मीडियावरही असे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, जे आपल्यातील क्रिएटिव्हिटीने जग जिंकतात. सर्वांना आपल्याकडे आकर्षित करून घेतात. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशा तयार करायच्या याचे व्हिडिओ तर तुम्ही पाहिले असतीलच. त्याच मालिकेतील आणखी एक व्हिडिओ आता समोर आला आहे. मोबाइल (Mobile) हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वपूर्ण घटक झालाय. त्यामुळे त्याची काळजीही आपण चांगल्याप्रकारे घेत असतो. त्याला चांगले कव्हर (Cover) लावतो. कव्हर थोडे जुने झाले, की आपण नवे घेत असतो. त्यावेळी जुने मात्र फेकून देतो. आता या कव्हरवर प्रयोग केल्याचा व्हिडिओ व्हायरल (Video viral) झाला आहे.
व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे, की एक मोबाइलचे ट्रान्सपरंट कव्हर घेतले आहे. त्यानंतर बड्स आणि आवडता रंग. आता पाहा, त्या कव्हरला कशाप्रकारे रंग दिला जात आहे. पहिल्यांदा पांढरा रंग दिला. त्यानंतर बड्सच्या सहाय्याने गुलाबी रंगाचे डिझाइन त्या कव्हरवर काढले. नंतर काळा रंग घेऊन त्याला आकर्षक रंगाने सजवले. आपणही आपल्या घरी अशा जुन्या झालेल्या कव्हरपासून नवा प्रयोग करू शकतो. आता व्हिडिओ पाहू या…
यूझर्सनी व्हिडिओला पसंती दिली असून यूट्यूबवर आरबी क्रिएटिव्ह वर्ल्ड (RB creative world) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. 13 मार्चला अपलोड केलेल्या या व्हिडिओला 8.2 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ‘Mobile Cover Craft‘ अशी कॅप्शन व्हिडिओला देण्यात आली आहे. तुम्हीही हा प्रयोग नक्की करून पाहा…