माजी मिस युनिव्हर्स आणि मॉडेल ऑलिव्हिया कल्पो(Olivia Culpo)नं अमेरिकन एअरलाइन्स(American Airlines)वर नाराजी व्यक्त केलीय. तिनं सांगितलं, की एअरलाइन्स कर्मचाऱ्यांनी तिच्या कपड्यांवर आक्षेप घेतला होता आणि त्याला क्रॉप टॉप झाकण्यासाठी ब्लाउज घालण्यास सांगितलं. तसं न केल्यास त्यांना विमानात बसू दिलं जाणार नाही, असंही सांगितलं.
इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर
‘डेली मेल’च्या बातमीनुसार, तिनं ही संपूर्ण घटना तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलीय. ऑलिव्हियानं सांगितलं, की ती तिची बहीण औरोरासोबत प्रवास करणार होती. त्यानंतर एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी तिला तिच्या कपड्यांमुळे तिथं थांबवलं. खरं तर, ऑलिव्हियानं क्रॉप टॉप आणि बाइक शॉर्ट्स घातली होती.
‘एवढा क्यूट ड्रेस असूनही…’
ऑलिव्हियाचा एक व्हिडिओ तिची बहीण औरोरानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्या ड्रेसमध्ये तिची बहीण खूपच सुंदर दिसत होती, असं तिनं लिहिलं आहे. तिनं म्हटलं, की मी आणि ऑलिव्हिया काबोला जात आहोत. तिचा पोशाख पाहा. ती खूप क्यूट दिसतेय. तरीही, एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी तिला या ड्रेसमुळे अडवलं आणि त्यावर ब्लाउज घालण्यास सांगितलं. तुम्हीच सांगा हे चुकीचं नाही का?
दुसऱ्या महिलेवर आक्षेप नाही?
त्यानंतर हाच व्हिडिओ ऑलिव्हियानं पुन्हा तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. तिनं लोकांना विचारलं, की हा पोशाख कुठं आक्षेपार्ह दिसतोय? मी स्वतः गोंधळून जातेय की हा ड्रेस विचित्र आहे का? मात्र, नंतर ऑलिव्हियानं त्यावर हुडी घातली. पण तिनं ऑलिव्हियासारखाच पोशाख घातलेली दुसरी स्त्रीही दाखवली. ती म्हणाली, की या महिलेनंही असाच ड्रेस परिधान केलाय, मात्र अमेरिकन एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी यावर आक्षेप घेतला नाही.
पोस्टवर पोस्ट
या घटनेनंतर ऑलिव्हियाला फ्लाइटमध्ये बसण्याची परवानगी देण्यात आली होती. पण तरीही ती आणि तिची बहीण त्यांच्या इन्स्टाग्रामवर या घटनेबद्दल सतत पोस्ट करत आहेत.