मुंबई : वयाच्या 21व्या वर्षी खूप संघर्ष करून मोहित बुंदस यांनी आयपीएस (IPS) अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. त्यानंतर आईच्या इच्छेखातर त्यांना आयएएस (IAS) अधिकारी व्हायचं होतं. त्यांनी त्यांच्या अथक प्रत्नाने ते यश देखील संपादन केलं. मात्र, मध्य प्रदेश (MP) केडरच्या आयएएस अधिकारी मोहित यांच्या आयआरएस असलेल्या पत्नीने हुंड्यासाठी छळ केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर लावला आहे. यानंतर भोपाळच्या महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर वनविभागाचे उपसचिव मोहित बुंदस यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मोहित यांची पत्नीनेनं आपल्या तक्रारीत मारहाणीचा आरोप केला आहे. मोहित बुंदस यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. ते पहिल्यांदा आयपीएस झाले. त्यावेळी ते फक्त 21 वर्षाचे होते. दरम्यान, पत्नीच्या आरोपानंतर मोहित अडचणीत आले आहेत.
मोहित बुंदस यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सुमारे 5 वर्षे आयपीएस अधिकारी होते. आयपीएस झाल्यानंतर त्यांनी झारखंड केडरमध्ये काम केलं होतं. प्रशिक्षणादरम्यान मोहित बुंदस इतरांचे एफआयआर लिहायचे आता त्याच्या पत्नीने त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, पत्नी त्याच्यापासून वेगळी राहत आहे. पत्नीच्या कार्यालयात घुसून शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
मोहित बुंदस हे छतरपूरचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी एका तरुणीला आपली संघर्ष गाथा सांगितली होती. सुनावणीदरम्यान मुलीने जिल्हाधिकाऱ्यांकडे इच्छामरणाची मागणी केली होती. यादरम्यान बुंदस हे मुलीला समजावण्यासाठी तिच्या घरी गेला होता. यावेळी त्यांनी सांगितले की, मी 10 वर्षांचा असताना माझ्या वडिलांचं निधन झालं होतं. काही दिवसांनंतर त्यांनी त्याचा मोठा भाऊही एका अपघातात गमावला. यानंतर संपूर्ण कुटुंब विखुरले गेलं होतं. पण, त्यांनी अथक प्रयत्नानंतर वयाच्या 21 व्या वर्षी IPS झाले. त्यानंतर आईच्या इच्छेनुसार त्यांनी आयएएस होण्याचा चंग बांधला. जिद्द चिकाटी आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी ते यश देखील संपादन केलं. दरम्यान, त्यांच्यावर त्यांच्या पत्नीने गंभीर आरोप लावले आहेत. मोहित यांची पत्नी देखील उच्च शिक्षित आहे. त्या आयआरएस अधिकारी आहेत. मात्र, त्यांनी मोहित यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या पत्नीने हुंड्यासाठी छळ केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर लावला आहे. त्यानंतर मोहित सध्या चर्चेत आहे.