मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) मागच्या काही दिवसांपासून मेट्रोतील अनेक व्हिडीओ व्हायरल (Metro viral video) झाले आहेत. त्यामध्ये काही लोकं डान्स करीत आहेत. तर कोणी मेट्रोमध्ये नको असलेल्या रिअॅक्शन देत आहेत. ज्या लोकांनी नवीन आणि वेगळं कायतरी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाले आहेत. सध्या एक माकडाचा मेट्रोमध्ये असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी अधिक कमेंट सुध्दा केल्या आहेत. हा व्हिडीओ दिल्ली मेट्रोमधील असून लोकांचं अधिक लक्ष वेचतं आहे. हा व्हिडीओ (trending viral video) जुना असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती शेअर झाला आहे.
ज्यावेळी ते माकडं मेट्रोमध्ये फिरत आहे. त्यावेळी तिथं असलेले प्रवासी अधिक मजा घेत आहेत. माकडं मेट्रोमध्ये इकडं तिकडं फिरताना दिसत आहे. कधी माकडं प्रवाशांच्या जागेवर बसले आहे. तर कधी अँगलला लटकताना दिसत आहे. त्याचबरोबर प्रवासात काही लोकं माकडं पाहून प्रचंड घाबरली आहेत. लोकं किती घाबरले आहेत, हे सुध्दा व्हिडीओत पाहायला मिळत आहे. या व्हिडीओ लोकांनी अधिक कमेंट सुध्दा केल्या आहेत.
हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरती शेअर केला आहे. हा व्हिडीओ सात दिवसापुर्वी शेअर करण्यात आला होता. हा व्हिडीओ आतापर्यंत 90 हजार पेक्षा अधिक लोकांनी लाईक केला आहे. या व्हिडीओला लोकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेतय. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, दिल्ली मेट्रोमधील अजून एक धमाका, लोकांच्या नंतर आता मेट्रोमध्ये जनावरांचा जलवा, आणखी एकाने म्हटले आहे की, दिल्ली मेट्रो हा बंडखोरीचा अड्डा बनला आहे.
सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ पाहिले जातात. सध्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर लोकांचे अधिक लक्ष वेचत असल्यामुळे चर्चेत आला आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ अधिक व्हायरल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.