कर्नाटक : सोशल मीडियावर मागच्या काही दिवसांपासून एका माकडाचा व्हिडीओ (Monkey Video) चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये माकड बसच्या विंडो सीटवरतीबसून मस्ती करीत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्याचा तो व्हिडीओ कर्नाटक (Karnataka) राज्यातील असल्याचं एका हिंदी वेबसाईटनं म्हटलं आहे. त्या व्हिडीओमध्ये दिसत असलेलं माकड केएसआरटीसी (KSRTC) च्या बसमधून प्रवास करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्या माकडाने सरकारी बसमधून ३० किलोमीटरपर्यंतचा प्रवास केला आहे. ते माकड हावेरी येथील बस थांब्यावर बसमध्ये चढले होते. हमसभावी गावात जाऊन उतरले अशी माहिती मिळाली आहे. माकड प्रवास करीत असताना सोबत प्रवास करणाऱ्या लोकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये त्या माकडाचं शुटींग केलं आहे. त्यापैकी एकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
त्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, एक माकड आरामात बसच्या विंडो सीटवरती बसलं आहे. जिथं माकडं बसलं आहे, तिथं एक बिस्कीटचा पुडा देखील ठेवण्यात आला आहे. माकडं मजेशीर पद्धतीने खिडकीच्या बाजूला असलेल्या सीटवर बसलं आहे. त्याचबरोबर विंडो सीटवरुन बाहेरचा परिसर पाहत आहे. हा व्हिडीओ १ मिनिट १८ सेंकदाचा आहे. सध्याचा व्हायरल व्हिडीओ तुम्ही नीट पाहिला तर, तर तुम्हाला इतर प्रवाशांचा आवाज येत आहे.
ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಬಸ್ ಪ್ರೀ ಅಂದಿದ್ದರ ಪರಿಣಾಮ
ಹಾವೇರಿ To ಹಿರೇಕೆರೂರಿಗೆ 30 KM ಬಸ್ನಲ್ಲಿ ಪ್ರಯಾಣ ಮಾಡಿದ ಕೋತಿ.
ಟಿಕೆಟ್ ತಗೋ ಅಂದ್ರೆ ನಾನೂ ಹೆಣ್ಣು ಅಂತಂತೆ..!!
ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಎಲ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ಮರದ ಮೇಲಿದೆ ಅಂತಂತೆ..!!
ಏನೇ ಮಂಗನಿಂದ ಮಾನವ ಅಲ್ಲವೇ ?#Congress #Shakthi #freebus #gurenartes pic.twitter.com/qHyMzt1PoB— ಒಕ್ಕಲಿಗ ( Okkaliga ) (@NanuVokkaliga) October 4, 2023
व्हायरल होत असलेला तो व्हिडीओ एक्सवरती @NanuVokkaliga नावाच्या खात्यावरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ मागच्या तीन दिवसांपासून शेअर झाला आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती सुध्दा शेअर झाला आहे. व्हिडीओमध्ये आणखी एक गोष्ट पाहायला मिळत आहे, ते माकडं कोणालाही परेशान करताना दिसत नाही. ते माकड आरामात विंडो सीटवरती बसलं आहे आणि बाहेरचा दृष्य पाहत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.