वॉशिंग्टन : कलियुगात काय काय पाहायला मिळेल देव जाणे ! सोशल मीडियातून (social media) तर रोज काहीबाही ऐकायला मिळत आहे. भावाने बहिणीशी रिलेशन ठेवले. मुलीने सावत्र बापाशी विवाह केला. अशा अनेक चित्रविचित्र बातम्या (different news) वाचायला मिळत आहेत. आता एका महिलेची एक माहिती समोर आली आहे. या महिलेने तिच्याच मुलाच्या मुलाला दत्तक (adopt) घेतलं आहे. त्यामुळे ही महिला आता त्या बाळाची आज्जीच नव्हे तर आईही (grandmother became mother to child) बनली आहे. नेमकं काय झालं? काय आहे हे प्रकरण ? त्यावर टाकलेला हा प्रकाश.
मीडिया रिपोर्टनुसार, ॲना ओब्रेगॉन नावाच्या 68 वर्षीय स्पॅनिश टीव्ही अभिनेत्रीने एक धक्कादायक खुलासा केला. आपण सरोगेसीने ज्या मुलाला दत्तक घेतलं आहे, ते तिच्या मुलाचंच बाळ आहे. मात्र, मुलगा आणि आईमध्ये कोणताही विचित्र प्रकार किंवा अनैतिक गोष्ट घडलेली नाही. केवळ मुलाची अंतिम इच्छा होती म्हणून हे सर्व घडल्याचं ती सांगते. पण नेमकं हे कसं घडलं? हा बाळ तिच्या मुलाचं कसं? जो व्यक्ती या जगात नाहीये त्याचं हे मूल कसं? असा सवाल अनेकांना पडला. त्यावर ॲनानेच खुलासा केला आहे.
असा झाला जन्म
ॲनाच्या मुलाचा वयाच्या 27 व्या वर्षी कर्करोगाने मृत्यू झाला होता. आपलं मूल या जगात जन्माला यावं, अशी इच्छा त्याने मृत्यूपूर्वी व्यक्त केली होती. एलेस लेक्विओचा मृत्यू 2020मध्ये झाला होता. मृत्यूपूर्वी एलेस ने त्याचे स्पर्म न्यूयॉर्कमध्ये फ्रिज करून प्रिजर्व केले होते. त्यानंतर सरोगसीच्या मदतीने एलेसच्या मुलाचा जन्म झाला. ज्या महिलेने सरोगसीने या मुलाला जन्म दिला ती फ्लोरिडाची रहिवाशी आहे. ती क्यूबियन आहे. दरम्यान, ॲनाने या घटनेचा खुलासा केल्यानंतर आता स्पेनमध्ये सरोगेसीच्या बायोएथिक्स आणि मुलाच्या पालनपोषणाच्या अधिकारावर चर्चा सुरू झाली आहे.
सरकार काय म्हणाले?
स्पेनमध्ये सरोगेसी बेकायदेशीर आहे. मात्र विदेशात जन्माला आलेलं मूल दत्तक घेतलं जाऊ शकतं. मात्र, या नव्या प्रकाराबाबत स्पेन सरकारचं मत वेगळं आहे. इक्वलिटी मिनिस्टर आयरिन मोंटेरो यांनी या प्रकारावर कठोर शब्दात टीका केली आहे. अशा प्रथा म्हणजे स्त्री शोषणच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. इतर देशात सरोगेटचा वापर रोखण्यसााठी कायद्यात बदल केला पाहिजे, असं सोशालिस्ट पार्टीचं म्हणणं आहे. मात्र, ॲनाने या चर्चांना वायफळ चर्चा म्हटलं आहे. सरोगेसी हा सहायक प्रजननाचं एक रुप आहे. स्पेनच्या बाहेरच्या जगात त्याला कायदेशीर मान्यताही आहे.