मुंबई : दोन दिवसापूर्वी मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) बसण्यावरुन दोन प्रवाशांचा वाद झाल्याचा एक व्हिडीओ (video viral) चांगलाचं व्हायरल झाला होता. सध्या एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे पोलिस आणि इतर रेल्वेची यंत्रणा सुध्दा खडबडून जागी झाली आहे. सहा तरुण लोकलमधून प्रवास करीत असताना ‘ड्रग्ज’ची नशा करीत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ (twitter trending video) पाहिल्यापासून लोकांना मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी असा नाराजीचा सूर व्यक्त केला आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी लोकलमध्ये घडली असल्याचं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, काही तरुण नालासोपारा स्टेशनच्या दरम्यान लोकलमध्ये खुलेआम पद्धतीने ड्रग्ज घेत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये काही तरुण गर्दीत नशा करीत आहेत. एक तरुण मोबाईलवरुन ड्रग्जची मागणी करीत आहे. @ADARSH7355 नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याने असं म्हटलं आहे की, सहा तरुण लोकांच्या गर्दीत ड्रग्जची नशा करीत आहेत.
हा व्हिडीओ जेव्हापासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तेव्हापासून रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. या प्रकरणातील आरोपींना शोधण्याचं काम पोलिसांनी सुरु केलं आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे पोलिसांना या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांचं पथक त्या जणांच्या मार्गावर असून कधीही त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
TODAY 1 SEPTEMBER 2023 TIME 1:30 IN VIRAR TRAIN GUY IS TAKING DRUGS ITS HAVE A GROUP OF 5 PEOPLE ALL ARE TAKING DRUGS AN ALL HAVE EXTRA DRUGS IN OUR POCKET AM SCARY THAT’S I HAVE THIS LITTLE VIDEO SHOOT ALL PEOPLE ARE GET AWAY IN NALASOPARA STATION #GRUGS #MUMBAIPOLICE #Mumbai pic.twitter.com/Hfp7NGHWqa
— ADARSH (@ADARSH7355) August 31, 2023
रेल्वे प्रशासनाकडून सगळ्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यापैकी एक जरी तरुण कुठेही फिरताना दिसला तरी त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात येणार आहे. सहा जणांवरती कडक कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांनी लोकांना आवाहन केलं आहे की, त्यापैकी तुम्ही कोणाला ओळखत असाल, तर आम्हाला नक्की मदत करा असं देखील आवाहन केलं आहे.