मुंबई : आपल्या देशात अधिक अशी लोकं असतील जी आयुष्य जगत असताना फक्त कारणं सांगतात. त्यांना असं वाटतं असतं की, त्यांचं आयुष्य चांगलं नाही. अशा लोकांनी हा व्हिडीओ नक्की (Inspirational Viral Video) पाहावा, त्याचबरोबर त्याच्यातून बरचं काही शिकायला हवं. जो व्हिडीओ व्हायरल (VIDEO VIRAL) झाला आहे. त्यामध्ये एक दिव्यांग व्यक्ती ज्या पद्धतीने मेहनत करत आहे. ते पाहून अनेकांनी त्या व्यक्तीला सलाम केला आहे. अनेकजण हा व्हिडीओ (TRENDING VIDEO) पाहून भावनिक झाले आहेत. अनेकांनी कमेंटमध्ये व्हिडीओ पाहताना डोळ्यात पाणी आलं सांगितलं आहे.
‘जिंदगी गुलजार है’ या इंस्टाग्रामच्या खात्यावरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये एक दिव्यांग व्यक्ती प्रचंड मेहनत करीत आहे. एका मजूर व्यक्तीचं काम ती दिव्यांग व्यक्ती करीत आहे. त्या व्यक्तीला पायावरती उभं राहता येत नाही. त्याचबरोबर त्याचा चालता सुध्दा येत नाही. परंतु तो प्रचंड जिद्दी असल्याचं दिसतं आहे. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरती हास्य दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला पाहायला मिळत आहे की, ती दिव्यांग व्यक्ती आपल्या डोक्यावरुन जड सामान घेऊन जात आहे. त्याची हिंमत आणि काम पाहून सोशल मीडियावर अनेकांनी त्या व्यक्तीला सॅल्यूट केला आहे.
त्या व्हिडीओला १ लाख ४० हजार लोकांनी लाईक केले आहे. विशेष म्हणजे ज्या लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे, त्यांनी कमेंटमध्ये त्याच्या कामाला आणि जिद्दीला सलाम केला आहे. एका व्यक्तीने कमेंटमध्ये सांगितलं आहे की, तरी सुध्दा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य आहे. लोकांच्या सगळ्या गोष्टी असताना सुध्दा काही लोकं रडतात, हेचं आयुष्याचं रडगाण आहे असंही एकाने कमेंटमध्ये म्हटलं आहे. आणखी एकजण कमेंटमध्ये म्हणतो की, ‘जीवनात ज्यांनी संघर्ष केलाय, ते सगळं काही मिळवू शकतात’ तिसरा व्यक्ती म्हणतो, जी लोकं आळशी आहे, वारंवार कारणं सांगतात. त्यांनी हा व्हिडीओ नक्की पाहावा.