नवी दिल्ली : ई कॉमर्स कंपनी मिंत्राने (Myntra) आपला लोगो बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील एका महिलेच्या तक्रारीनंतर मिंत्राने हा निर्णय घेतला आहे. मिंत्राच्या लोगोमुळे महिलांच्या भावना दुखावत असून, त्यांचा अपमान करणारा आहे, असा आरोप एका महिलेने केला होता. या महिलेने थेट सायबर पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता मिंत्राने एक पाऊल मागे घेत, आपला लोगो बदलण्याचा निर्णय घेतला आहे. (Myntra Change its Logo After Women Complaint)
नाज पटेल असं या तक्रारदार महिलेचं नाव आहे. ही महिला अवेस्टा फाऊंडेशन (Avesta Foundation NGO) या स्वयंसेवी संस्थेत काम करते. नाज पटेल यांनी डिसेंबर 2020 मध्ये मिंत्राविरोधात तक्रार दाखल केली होती.]
केवळ लोगो हटवण्याचीच मागणी नाही तर कंपनीविरोधात कडक कारवाई करण्याचीही मागणी त्यांनी केली. इतकंच नाही तर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही या लोगोविरोधात मोहीम उघडली होती.
मिंत्राचा लोगो महिलांचा अपमान करणारा आहे. कारण त्यात एक महिला पाय फाकवून बसलीय असं सूचित करण्यात आलं आहे. काही काळापूर्वी तक्रारकर्त्या नाज पटेल ह्या एका कार्यक्रमात गेल्या होत्या. तिथं मिंत्राची जाहिरात दाखवली गेली. त्यावेळी काही पुरुष मंडळी त्यावर कुजबूज करायला लागली. तक्रारकर्त्या नाज पटेलांनी त्याबद्दल विचारणा केली पण पुरुष मंडळी त्यावर त्याक्षणी काही बोलली नाही. नंतर त्यांनी खासगीत एक दोन पुरुषांना विचारलं त्यावेळेस त्या लोगोत महिला स्वत:चे दोन्ही पाय फाकवून बसलीय असं दाखवण्यात आल्याचं काहींचं म्हणणं होतं, नंतर निरीक्षणाअंती ते पटलं. (Myntra Change its Logo After Women Complaint)
याबाबत मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या डीसीपी रश्मी करंदीकर म्हणाल्या, “मिंत्राचा लोगो महिलांसाठी अपमानजनक असल्याची तक्रार आम्हाला मिळाली होती. त्यानुसार आम्ही मिंत्राला एक ई मेल पाठवला होता. त्यानुसार मिंत्राचे अधिकारी आम्हाला भेटायला आले. त्यांनी एक महिन्यात लोगो बदलण्याचं सांगितलं”
Myntra नक्की काय?
फ्लिपकार्ट ग्रुपची कंपनी मिंत्रा ही देशातील सर्वात मोठी फॅशन ई-रिटेलर्स वेबसाईट आहे. गेल्या महिन्यात ‘End of Reason Sale दरम्यान 11 मिलीयन वस्तूंची विक्री केली होती. तर यावेळी 5 million ऑर्डर्स आले होते. (Myntra Change its Logo After Women Complaint)
संबंधित बातम्या :
Myntra बिग फॅशन फेस्टिव्हलची धमाकेदार सुरुवात, पहिल्याच दिवशी 1.4 कोटी वस्तूंची खरेदी
App वरुन कर्ज घेत असाल तर सावधान; 1000 बेकायदेशीर मोबाईल लँडिंग अॅप्स RBI च्या रडारवर