100 वर्षांपूर्वीच्या पुस्तकात असे आहे तरी काय, 11 कोटी रुपये किंमत, खरेदीसाठी खासगी विमानाने आली ही व्यक्ती

| Updated on: Jun 01, 2024 | 4:39 PM

Napoleon Hill Book : तर अमेरिकन लेख नेपोलियन हिल हे नाव घेताच अनेकांच्या लक्षात आले असेल की पुस्तक कोणत्या श्रेणीतील, विषयाशी संबंधित असेल. हिल यांनी अनेकांच्या मनाला मोठी उभारी दिली आहे. पण त्यांच्या पुस्तकासाठी या उद्योगपतीने 11 कोटी रुपये मोजले आहे. काय आहे विशेष?

100 वर्षांपूर्वीच्या पुस्तकात असे आहे तरी काय, 11 कोटी रुपये किंमत, खरेदीसाठी खासगी विमानाने आली ही व्यक्ती
पुस्तक खरेदीसाठी मोजले 11 कोटी
Follow us on

नव्या पिढीतील कित्येक जण समाज माध्यमांवर पडीक असतात. पण त्यातील थोडेच जण पुस्तक चाळतात, वाचतात. ज्यांना पुस्तक वाचणे आवडते अशांची संख्या खालावलेली नाही. पण कमी मात्र नक्कीच झाली आहे. अनेक जण आजही दुसऱ्या ठिकाणी गेले की सोबत पुस्तक ठेवतात. त्यांना पुस्तक वाचणे आवडते. प्रवासात अथवा निसर्गरम्य ठिकाणी पुस्तक वाचण्यासारखा दुसरा आनंद नाही. पण एखाद्या पुस्तकासाठी कोणी 11 कोटी रुपये मोजल्याचे तुम्हाला माहिती आहे का? आणि हे पुस्तक खरेदीसाठी कोणी खासगी विमानाने प्रवास करुन आले, यावर तुमचा विश्वास बसतो का? पण हे घडले आहे. ही पुस्तक खरेदी सध्या जगभरात कौतुकाचा विषय ठरला आहे. काय खास आहे या पुस्तकात?

100 वर्षांपूर्वींचे पुस्तक

तर हे पुस्तक 100 वर्षांपूर्वीचे आहे. हे पुस्तक लोकप्रिय अमेरिकन लेखक नेपोलियन हिल यांनी वर्ष 1925 मध्ये लिहिले होते. या पुस्तकाचे नाव
‘द लॉ ऑफ सक्सेस’ असे आहे. अमेरिकेतील इडाहो येथे राहणाऱ्या रसेल ब्रनसन या उद्योगपतीने या पुस्तकाची पहिली प्रत खरेदी केली आहे. या प्रतीवर नेपोलियन यांची स्वाक्षरी आहे. डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, रसेल यांना हे पुस्तक ऑनलाईन विक्री होणार असल्याची माहिती मिळाली. नेपोलियन यांच्या स्वाक्षरीची पहिली प्रत मिळत असल्याने त्यांना स्वतःला रोखता आले नाही. त्यांनी हे पुस्तक खरेदीचा विचार पक्का केला.

हे सुद्धा वाचा

पुस्तक खरेदी नव्हती सोपी

या पुस्तकाची किंमत 1.5 दशलक्ष डॉलर म्हणजे 11 कोटी रुपयांहून अधिक होती. त्यामुळे इच्छुकांना हे पुस्तक खरेदी करणे सोपे नव्हते. रसेल यांनी हार मानली नाही. त्यांनी एक महिना विक्रेत्याचा पिच्छा सोडलाच नाही. शेवटी त्याने तडजोड केली. पण पत्नीला कसे तयार करावे हा मोठा प्रश्न होता. 11 कोटी रुपये मोजून पुस्तक खरेदी करणे हा व्यवहारी विचार नव्हताच. पण त्याने पत्नीला पण तयार केले.

खासगी विमानाने पुस्तक आणले घरी

डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, रसेल हे उद्योगपती आहेत. त्यांच्याकडे नेपोलियन हिलच्या पुस्तकांचा मोठा संच आहे. त्यांनी अनेक पुस्तकं खरेदी केली आहेत. 11 कोटी रुपये खर्चून पुस्तक आणायचे तर मग कारने कशाला जायचे? विमानाने जाऊयात, त्यामुळे या पुस्ताकाला धूळ-माती सुद्धा लागणार नाही, असा विचार रसेल यांनी केला आणि खासगी विमानाने ते हे पुस्तक घेऊन आले.