ॲमस्टरडॅम : पैसा कमावण्यासाठी लोक काहीही करायला तयार होतात. मग त्यांची कृती नैतिक, सामाजिक आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे की नाही हेही पाहत नाही. पैशाच्या लोभापोटी (for money) लोक विचित्र गोष्टी करतात आणि नंतर अडचणीत येतात. त्याचप्रमाणे नेदरलँडमधील एक व्यक्ती अडचणीत आली आहे, कारण तो मनुष्य तब्बल 550 मुलांचा बाप (father of 550 children) आहे! त्याच्या या कृत्यामुळे कोर्टाने त्याच्यावर बंदी घातली आहे.
डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, नेदरलँडमधील (Netherland) एका कोर्टाने नुकतीच 41 वर्षीय जोनॅथन मेजर यांच्यावर बंदी घातली आहे. म्हणजेच जोनाथन यापुढे अधिक मुलांचा बाप होऊ शकत नाही. पण तो खरोखरच 550 मुलांचा बाप आहे का? प्रत्यक्ष नव्हे पण अप्रत्यक्षपणे तोच त्या मुलांचा बाप आहे ! खरं तर, जोनॅथन एक स्पर्म डोनर (sperm donor)आहे. तो नेदरलँडमधील अनेक क्लिनिकमध्ये शुक्राणू दान करतो आणि भरपूर पैसे कमावतो. मात्र आता त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे की तो अधिक शुक्राणू दान (sperm donate) करू शकत नाही.
लावण्यात आला दंड
एका रिपोर्टनुसार, जोनॅथनने पुन्हा असे केल्यास त्याला 90 लाख रुपये दंड भरावा लागेल. देशाच्या नियमांनुसार, कोणताही पुरुष 12 महिलांद्वारे 25 मुलांचा बाप होऊ शकतो. पण त्यापेक्षा जास्त नाही. पण जोनॅथनने हा नियम मोडला. हेग जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान, जोनॅथनने आपल्या ग्राहकांना आपल्या देणग्यांबद्दल खोटे सांगितल्याचे उघड झाले. डच सोसायटी ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजीने 2017 मध्ये प्रथम सर्वांना जोनॅथनबद्दल सतर्क केले. पण तोपर्यंत नेदरलँडमधील 10 क्लिनिकमध्ये शुक्राणू दान करून जॉनॅथन 102 मुलांचा पिता बनला होता.
दुसऱ्या देशांमध्येही विकले स्पर्म
जोनॅथनला त्याच्या देशात ब्लॅकलिस्ट करण्यात आले, त्यामुळे त्याने परदेशात स्पर्म डोनेट करण्यास सुरुवात केली. या माणसाने स्पर्म अनेक डच फर्टिलिटी क्लिनिकमध्ये, डॅनिश क्लिनिकमध्ये आणि लोकांशी ऑनलाइन संपर्क साधून लोकांना विकले. जोनाथनच्या वकिलाने कोर्टाला सांगितले की, त्याला फक्त अशा जोडप्यांना मदत करायची आहे जे कधीच पालक होऊ शकत नाहीत.