Snake & Frog : साप हा जगातील सर्वात विषारी प्राण्यांपैकी एक आहे. सापाला पाहून भल्याभल्यांचा थरकाप उडतो. साप बेडकांना जिवंत गिळत असल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. अनेकदा माणसांना सापांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, की आयुष्यात कधीही हार मानू नये. एका गेटवर चढणाऱ्या बेडकाचा (Frog) पाय एका धोकादायक काळा सापाने (Snake) पकडून ठेवल्याचे व्हिडिओमध्ये (Video) दिसत आहे. बेडूक स्वतःला सापापासून मुक्त करण्याचा प्रयत्न करत असताना साप बेडकाला जिवंत गिळण्याचा प्रयत्न करत असताना असे हे चित्र दिसत आहे. आपण पाहू शकता, की सापाने बेडकाचा पाय घट्ट पकडला आहे. खूप प्रयत्नांनंतर शेवटी बेडूक स्वतःला सापाच्या तावडीतून मुक्त करण्यात यशस्वी होतो. यानंतर तो उडी मारून तेथून पळून जातो.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की बेडूक इतक्या वेगाने धावतो, की साप त्याला पुन्हा पकडू शकत नाही. सापसुद्धा आपला पाठलाग इतक्या सहजासहजी सोडू इच्छित नाही. म्हणूनच तोही गेटवरून झटपट खाली येतो आणि बेडकाच्या दिशेने वेगाने सरकतो. इथेच व्हिडिओ संपतो. त्यामुळे सापाने बेडकाची पुन्हा शिकार केली, की बेडूक स्वतःला वाचवण्यात यशस्वी झाला की नाही हे कळू शकले नाही.
Never give up ?
VC:Fred pic.twitter.com/7rLSDZeNCx— Susanta Nanda IFS (@susantananda3) April 2, 2022
हा व्हिडिओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, की कधीही हार मानू नका. हा व्हिडिओ इतका जबरदस्त आहे, की तो आतापर्यंत 67 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओ पाहून लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. व्हिडिओ पाहून एका यूझरने ‘जे प्रयत्न करतात ते कधीही हार मानत नाहीत’, अशी कमेंट केली.