जर्मनीतील या कारागृहात राहणाऱ्या कैद्यांना झोपण्यासाठी अलिशान बेड, पर्सनल वॉशरूम, वैयक्तिक शौचालय अशा सुविधा मिळतात. या कारागृहात कैद्यांना लॉन्ड्री मशीन, कॉन्फरन्स रूम अशा सुविधाही पुरविल्या जातात.
हे कारागृह लिओबेन या ऑस्ट्रियाच्या पर्वतीय भागात आहे. इथे कैद्यांना सर्व सोई-सुविधा मिळतात. जश्या लक्झरी 5 स्टार हॉटेलमध्ये मिळतात. इथल्या कैद्यांना जिम, स्पा सारख्या सुविधाही पुरवल्या जातात. याशिवाय कैदी इथे इनडोअर गेम्सही खेळू शकतात. इथल्या कैद्यांना वैयक्तिक स्नानगृह, लिव्हिंग रूम आणि स्वयंपाकघरदेखील मिळतं.
स्कॉटलंडमधील एचएमपी जेलमध्ये राहणाऱ्या कैद्यांना खास सोई-सुविधा दिल्या जातात. या कैद्यांना 40 आठवडे उत्पादक कौशल्यांचे प्रशिक्षण देखील दिले जाते, जेणेकरून ते चांगले काम करण्यासाठी आणि आरामदायी जीवन जगू शकतील.
स्वित्झर्लंडमधील चॅम्प्स-डॉलन तुरुंग... एकेकाळी इथे जास्त कैदी ठेवण्यात येत असल्याने त्यावर टीका व्हायची. पण आता मात्र इथे राहणाऱ्या कैद्यांना एखाद्या चांगल्या वसतिगृहाप्रमाणे सोई उपलब्ध आहेत. चांगल्या रूम्स आणि कैद्यांना बेडही दिले जातात.
न्यूझीलंडमध्ये असलेल्या या तुरुंगात कैद्यांना सर्व सुविधा मिळतात. या कारागृहात कैद्यांना शेती, लाईट इंजिनीअरिंग, स्वयंपाक यांसारख्या कामात पारंगत करण्यासाठी त्यांना प्रशिक्षणही दिलं जातं. या कारागृहात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली जाते.