नवी दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून दिल्ली (Delhi Metro) आणि मुंबई मेट्रोमधील (Mumbai Metro) अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे. मेट्रोमध्ये कधी गाणं म्हणतंय, तर कधी कोणी डान्स करीत आहे. आणखी काही मुलं कधी मुलींची कपडे घालत आहे. कोणी मेट्रोमध्ये अंधोळ करीत आहे. मागच्या काही दिवसांपुर्वी मेट्रोमध्ये एक कपल किस करीत असल्याचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला होता. सध्याचा व्हिडीओ लोकांचं अधिक लक्ष वेचतं आहे. त्यामध्ये एक मुलगा मेट्रोमध्ये गुडघ्यावर बसला आहे. हे सगळं पाहून असं वाटतंय की, एक मुलगा दुसऱ्या मुलाला प्रपोज करीत आहे.
हा व्हिडीओ दिल्लीतील मेट्रोमधील असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळत आहे की,ज्यावेळी दुसरं स्टेशन येत त्यावेळी एक मुलगा दुसऱ्या मुलाला गुलाबाचं फूल देत आहे. त्यावेळी तिथं असलेली लोकं हे सगळं पाहून हसत आहेत. त्याचवेळी मुलाच्या बाजूला असलेल्या मुलीची रिअॅक्शन पाहण्यासारखी आहे. ज्यावेळी मेट्रोमध्ये असलेला मुलगा दुसऱ्या मुलाला गुलाब देतो, त्यावेळी दोघेही एकमेकांची गळाभेट घेत आहेत. ‘तू ही यार मेरा’ हे गाणं व्हिडीओ लावण्यात आलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुध्दा अंदाज लावला असेल. तिथं असलेल्या काही लोकांनी हा व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद केला आहे, त्याचबरोबर नंतर सोशल मीडियावर शेअर सुध्दा केला आहे.
Get well soon Delhi Metro. pic.twitter.com/VCBZbevYkq
— Rishabh (Professor) (@ProfesorSahab) May 9, 2023
सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ट्विटरवरती @ProfesorSahab नावाच्या अकाऊंवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अनेक लोकांनी पसंत केला आहे. हा व्हिडीओ १९ सेंकदाचा आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 72 हजार लोकांनी पाहिला आहे. अनेक लोकांनी या व्हिडीओला लाईक सुध्दा केले आहे. व्हिडीओ पाहून लोकं वेगवेगळ्या पद्धतीच्या रिअॅक्शन देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘होय, आम्हाला हे सर्व रोज पहावे लागेल.’ व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘गेट वेल सून दिल्ली मेट्रो.’