नवी दिल्ली : प्रेम (love) ही एक पवित्र भावना आहे. पण प्रेमात विश्वास (trust in love) असणं अत्यंत महत्वाचं आहे. जर तुमचा तुमच्या जोडीदारावर विश्वास नसेल तर तुमचे नाते जास्त काळ टिकणार नाही. एक ना एक दिवस संशयामुळे संबंध तुटतील. मात्र, काही लोक आपल्या जोडीदारावर लक्ष ठेवण्यासाठी विविध उपाय करतात. काहीजण घरात सीसीटीव्ही लावतात, तर काही फोन करून अपडेट घेत असतात. त्याच पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर एका खास प्रकारच्या अंडरगारमेंटचा (undergarment) फोटो खूप व्हायरल होत आहे.
ही व्हायरल झालेली अंडरगारमेंट संशयित लोकांची पहिली पसंती व्हायला फारसा वेळ लागणार नाही. ज्या लोकांना असे वाटते की त्यांचा जोडीदार त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्याशिवाय इतर कोणाला भेटतो, त्यांच्यासाठी हा ड्रेस परफेक्ट ठरू शकतो. खरं तर, तुम्हाला या अंडरगारमेंटसोबत एक लॉक (कुलूप) आणि चावी मिळेल. याचा अर्थ तुम्ही तुमच्या पार्टनरला हा ड्रेस घालायला सांगून तो लॉक करू शकता. जेणेकरून इतर कोणीही तो (ड्रेस) उघडू शकणार नाही. या पोशाखाची सध्या खूपच चर्चा सुरू आहे. लोकांना त्याचे फॅब्रिक खूप आवडले आहे.
हा पोशाख अथवा ड्रेस संशयी लोकांचा आवडता , असे याचे वर्णन केले जात असले तरी प्रत्यक्षात तो काही अन्य हेतूने लाँच करण्यात आला आहे. एका लॉन्जरी (अंतर्वस्त्र) मॉडेलने तिचा तो परिधान केलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे फॅशन नोव्हाने डिझाइन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे बेडरूममधील रोमान्सची रंजकता वाढवण्यासाठी केले आहे. मॉडेलने हा ड्रेस अतिशय सुंदरपणे परिधान केला आणि तिचे काही फोटोही शेअर केले.
पण किंमत किती ?
फॅशन नोव्हाच्या या नवीन अंडरगारमेंटची किंमत जेन्युईन आहे. त्याची किंमत फक्त 35 युरो म्हणजेच सुमारे साडेतीन हजार रुपये आहे. सध्या या ड्रेसचे दोन रंग उपलब्ध आहेत, एक काळा आणि दुसरा गुलाबी. या ड्रेसच्या पोटाजवळ एक कुलूप आहे. या लॉकची चावी ड्रेससोबत दिली आहे. सोशल मीडियावर लोकांनी या ड्रेसला पाचपैकी पाच रेटिंग दिले आहे. एका व्यक्तीने लिहिले की, हा तिचा आतापर्यंतचा सर्वात आवडता ड्रेस बनला आहे. त्याचबरोबर अनेकांनी त्याच्या गुणवत्तेचे कौतुकही केले.