हॉस्पिटलच्या नर्सनेच केला घात, सात नवजात शिशूंना एकामागोमाग संपविले, स्वत:ला राक्षस म्हटल्याचं उघड

| Updated on: Aug 19, 2023 | 3:15 PM

नर्स लूसीला दोषी सिद्ध केल्यानंतर डॉ. रवि जयराम यांनी म्हटले की लूसीच्या कृत्यामुळे चार-पाच बालके आता शाळेत जाण्याच्या वयाची झाली आहेत, परंतू ती शाळेत जाऊ शकत नाहीत.

हॉस्पिटलच्या नर्सनेच केला घात, सात नवजात शिशूंना एकामागोमाग संपविले, स्वत:ला राक्षस म्हटल्याचं उघड
nurse
Image Credit source: socialmedia
Follow us on

ब्रिटन | 19 ऑगस्ट 2023 : डॉक्टर आणि नर्स आपल्या बरे करण्यासाठी प्रयत्नाची शिकस्त करीत असतात. परंतू एका नर्सने तिच्या पेशाला काळीमा फासणारी कृती केली आहे. इंग्लंडच्या एका रुग्णालयातील एका नर्सने तब्बल तेरा नवजात बालकांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. त्यातील सात नवजात शिशूंना आपले प्राण गमवावे लागले आहेत. विशेष कोर्टात हे प्रकरणातील आरोप सिद्ध होण्यात एका भारतीय वंशाच्या डॉक्टराने मदत केल्याचे उघडकीस आले आहे.

मॅंचेस्टर क्राऊन कोर्टात जुरींनी नर्स लूसी लेटबी ( 33 ) शुक्रवारी सात नवजात शिशूंची हत्या करणे आणि सहा अन्य शिशूंच्या हत्येचा प्रयत्न करण्याच्या प्रकरणात दोषी सिद्ध असल्याचे सिद्ध केले. सोमवारी या प्रकरणात तिला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. यानंतर इंग्लंडच्या चेस्टर शहरातील काऊंटेस ऑफ चेस्टर रुग्णालयातील भारतीय वंशाचे डॉक्टर रवि जयराम यांनी सांगितले की नर्स लुसी लेटबी हीला आधीच ओळखणे शक्य झाले असते तर पोलिस वेळीच सावध झाले असते.

असे भयानकपणे संपविले

नर्स लूसीला दोषी सिद्ध केल्यानंतर डॉ. रवि जयराम यांनी म्हटले की लूसीच्या कृत्यामुळे चार-पाच बालके आता शाळेत जाण्याच्या वयाची झाली आहेत, परंतू ती शाळेत जाऊ शकत नाहीत. तिने 2015 ते 2016 दरम्यान या हत्या केल्या. जेव्हा तीन मुलांचा मृत्यू झाला तेव्हा चिंता व्यक्त केली गेली. यासंदर्भात अनेक तज्ज्ञांच्या बैठका झाल्या. एप्रिलमध्ये डॉक्टरांना पोलिसांना भेटण्याची परवानगी दिली. डॉ. जयराम यांनी सांगितले की पोलिसांना सर्व माहीती दिल्यानंतर त्यांनी तपास सुरु केला. नर्स लूसी लेटबी हीला अटक झाली. लूसी नवजात शिशूंच्या रक्तात आणि पोटात हवा भरुन त्यांना दूधापाजून संपवायची, त्यांना इंसूलिनद्वारे विष द्यायची असे पोलिसांनी सांगितले.

स्वत: ला राक्षस म्हटले

नर्स लूसीचा हेतू शिशूंचा जीव घेणे हाच होता. ती त्यानंतर आपल्या सहकाऱ्यांना हा मृत्यू नैसर्गिक झाल्याचे पटवायची.सरकारी पक्षाच्या वकीलाने सांगितले की हे भयानक प्रकरण आहे. नर्सच्या घरात मिळालेल्या नोट्स मध्ये तिने स्वत: ला राक्षस म्हटले आहे.