मुंबईः ओडिशातील दोन आयएएस अधिकाऱ्यांच्या लग्नाची चर्चा सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. खरं तर या दोन्ही आयएएस अधिकाऱ्यांचा घटस्फोट झाला असून आता ते लवकरच पुन्हा लग्न करणार आहेत. संबलपूरचे जिल्हाधिकारी आणि आयएएस अधिकारी अनन्या दास यांनी बालंगीरचे जिल्हाधिकारी चंचल राणा यांच्याशी संबलपूरमध्ये निवासस्थानी साखरपुडा केल्याचे सांगण्यात आले आहे. या दोन्ही आयएएस अधिकाऱ्यांनी मित्र, कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईकाच्या उपस्थितीतमध्येच त्यांनी पारंपरिक पद्धतीने एकमेकांना अंगठी घातली असल्याचे सांगण्यात आले आहे.
या आएएस अधिकाऱ्यांबद्दल सांगण्यात येत आहे की, हे आयएएस जोडपं येत्या काही दिवसांमध्येच लग्नबेडीत अडकणार आहेत. या कार्यक्रमामध्ये संबलपूरचे एसपी आणि सुवर्गपूरचे जिल्हा दंडाधिकारीही उपस्थित होते.
आयएएस चंचल राणा यांचे कुटुंबीयही या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संबलपूरमध्ये आले होते. राणा आणि अनन्या यांनी या कार्यक्रमाच्या आधी एक दिवसापूर्वीच दागिन्यांच्या दुकानात जाऊन सोन्याची खरेदीही केल्याचे त्यांनी सांगितले.
आसामची असलेल्या अनन्या दासचे लग्न यापूर्वी कोरापुटचे कलेक्टर अब्दुल एम. अख्तर यांच्याबरोबर झाला होता. मात्र दोघांमधील मतभेदांमुळे त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.
तर चंचल राणा यांचा हा पहिला विवाह रायगडच्या कलेक्टर असलेल्या स्वधा देव सिंह यांच्याबरोबर झाला होता. या दोघांचे लग्नही जास्त काळ टिकले नव्हते.
आता चंचल आणि अनन्याने एकमेकांचा हात धरण्याचा निर्णय घेतला आहे. अनन्या दास 2015 च्या गुजरात केडरच्या आयएएस अधिकारी आहेत.
त्या कटक महानगरपालिकेच्या आयुक्तही होत्या. तर चंचल राणा यांनी एनआयटी सिलचरमधून शिक्षण घेतले असून ते 2014 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 2015 मधील टॉपर टीना दाबीदेखील त्यांच्या दुसऱ्या लग्नानंतर चर्चेत आल्या होत्या. त्यांचेही पहिले लग्न हे आयएएस अधिकारी अतहर खानबरोबर झाले होते. पण त्यांचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर त्यांनी प्रदीप गावंडे या आयएएस अधिकाऱ्याबरोबर लग्न केले होते.