Viral video: तुम्ही सर्वांनी मेंढ्या (Sheep) पाहिल्याच असतील, मेंढ्या जगभरात आढळतात. अनेक देशातील लोकांचा मुख्य व्यवसाय देखील मेंढीपालन आहे. मेंढ्या शहरात क्वचितच आढळतात. खेडे गाव आणि डोंगराळ भागात वास्तव्याला असलेले लोक प्रमुख्याने मेंढीपालन (Sheep rearing) करतात. डोंगराळ भागात पाण्याचा अभाव असल्याने शेती करता येत नाही, त्यामुळे अशा भागात राहणारे लोक आपल्या उपजिवीकेचे साधन म्हणून मेंढी पालनाचा व्यवसाय करतात. मेंढ्याचे मानवाला अनेक फायदे आहेत. मेंढ्यापासून लोकर मिळते. ज्याचा उपयोग थंडीच्या दिवसांमध्ये स्वेटर बनवण्यासाठी होतो. लोकरीसोबतच मांस आणि दूधाच्या उत्पादनासाठी देखील मेंढीपालन केले जाते. मेंढी हा तसा शांत प्राणी आहे. मात्र राग आल्यानंतर तो आक्रमक देखील होऊ शकतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Viral video)एक मेंढी प्रचंड आक्रमक झाली आहे. ती मेंढी संबंधित व्यक्तीवर हल्ला करणारच इतक्यात हा व्यक्ती या हल्ल्यापासून बचावासाठी असे काही डोके लावतो की, हा व्हिडीओ पाहणाऱ्यांना हसू आवरणार नाही.
तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहून शकता, एका व्यक्तीचा मेंढीला राग आला आहे. राग आल्याने ही मेंढी प्रचंड आक्रमक झाली आहे. ही मेंढी या व्यक्तीवर हल्ला करण्यासाठी दूरून पळत येत आहे. मेंढी आपल्याच दिशेने पळत येत असल्याचे पाहून संबंधित व्यक्ती देखील सावध झाला आहे. त्याने ती मेंढी आपल्याजवळ येताच या मेंढीला आपल्याजवळ असलेले बिस्किट खायला दिले. त्यानंतर मेंढीचा राग देखील शांत झाला आणि या मेंढीने बिस्किट खायला सुरुवात केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून, हा व्हिडीओ पाहून नेटकरी आपले हसू आवरू शकत नाहीये. मेंढ्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र हा व्हिडीओ खूपच गंमतीशीर असल्याची प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो जणांनी पाहिला आहे.
Problems approach differently…ends differently…take a deep breath and let it go…. pic.twitter.com/2KGQH8MATe
— Dr.Samrat Gowda IFS (@IfsSamrat) February 15, 2022
अबब… महिलेच्या पोटातली गाठच 47 किलोची? अहमदाबादमधल्या डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न!
VIDEO : हम भी किसी से कम नहीं… म्हणत पुण्यातील महिलांचा मराठी तडका! श्रीवल्लीवर थिरकल्या…