नवी दिल्ली : समजा आपण रात्री झोपलो आणि सकाळी उठून पाहीले की आपला एक अवयव रातोरात गायब झाला आहे, तर आपली काय अवस्था होईल. असाच धक्कादायक प्रकार एका 21 वर्षीय तरूणाच्या बाबतीत घडला आहे. रात्रीचा हा २१ वर्षीय मुलगा गाढ झोप आल्याने रात्री झोपला आणि त्याच्या सोबत अशी काही विचित्र घटना घडली की त्यास समजलेच नाही. वास्तविक हे प्रकरण अमेरिकेतील फ्लोरीया येथील आहे. काय झाले नेमके या मुला बाबत हे पाहूयात…
अमेरिकेच्या फ्लोरीडा राज्यातील मायकल क्रुंम्होल्ज याच्याबाबतीत एक विचित्र घटना घडली आहे. हा एकवीस नागरिक तरूण रात्रीचा लेन्स घालून झोपला. तेव्हा एका दुर्मिळ परजीवी किड्याने त्याच्या डोळ्याचे बुब्बुळ खाऊन टाकल्याचे उघडकी आले आहे.
माईक हा गेल्या सात वर्षांपासून डोळ्यांना कॉण्टेक्ट लेन्स लावत आहे, कॉण्टेक्ट लेन्स लावणारे लोक रात्रीचे लेन्स काढून झोपतात. परंतू त्या रात्री लेन्स काढायला तो विसरला. त्या रात्री त्याची चुक त्याला खूपच भारी पडली. त्याने सकाळी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला खूपच वेदना झाल्या. त्यानंतर असे उघडकीस आले आहे की एका पॅरासाईट परजीवीने त्याच्या डोळ्याचा भाग खाल्ला. हे परजीवी मानवी अवयव खातात. त्यामुळेच एक डोळा त्याला गमवावा लागला आहे.
सकाळी मायकलला डोळा उघडताना खूपच वेदना झाल्या, मग त्याने डोळे उघडून पाहीले तर त्याचे एका डोळ्याचे बुबुळ पांढरे झाले होते, डॉक्टरांनी डोळे तपासून त्याला सांगितले की त्याचा एक डोळा पॅरासाईटने खाल्ला आहे. तेव्हा त्याला विश्वासच बसेना, परंतू त्याला अखेर आपल्याला एक डोळा नाही यावर विश्वास ठेवावा लागला. त्याच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतू त्याची दृष्टी काही परत आली नाही. शेवटी त्याला आता त्याचे काम देखील नीट करता येत नाही. त्याला कायमचे एका डोळ्याने काम करावे लागेल. वास्तविक आपण जेव्हा डोळ्यांना लेन्स लावतो. तेव्हा आपल्या जलन किंवा खाज येत असते. त्यामुळे दर चार ते पाच तासांनी लेन्स काढावी लागते. झोपताना कोणत्याही परिस्तितीत झोपताना लेन्स काढूनच झोपले पाहीजे.