मुंबई : क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency), शेअर मार्केटमध्ये अनेकजण गुंतवणूक करतात. त्यातून काहींना चांगला परतावा मिळतो तर काहींचं नुकसान होतं. क्रिप्टो मार्केट क्रॅश झाल्यानंतर एका व्यक्तीचं 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालं आहे.कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्यानंतर ही व्यक्ती डिप्रेशनमध्ये (Depression) गेली. त्यानंतर त्याला त्यातून बाहेर पहण्यासाठी ट्रिटमेंट घ्यावी लागली. नंतर त्याने स्वत: समजावलं की पैसा हे सर्वस्व नाही. या व्यक्तीने आपली ही सगळी कथा सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडली आहे. याची सध्या जोरदार चर्चा (Viral News)होत आहे.
क्रिप्टो मार्केटमध्ये 21 कोटींहून अधिक पैसे गमावलेल्या व्यक्तीचं नाव ओलाजाइड ओलायंका विल्यम्स आहे. सोशल मीडियावर त्याला KSI म्हणून त्याला ओळखलं जातं. KSIने सांगितलं की मार्केट क्रॅश झाल्यानंतर मी 21 कोटींची क्रिप्टोकरन्सी गमावली आहे. ब्रिटीश यूट्यूबर आणि रॅपर KSI यांनी क्रिप्टोकरन्सी लुनामध्ये गुंतवणूक केली होती, ज्यामध्ये त्यांचे मोठे नुकसान झाले. खरं तर, लूनाचे मूल्य 24 तासात 97% घसरलं. त्यामुळे इथरियम ETH आणि बिटकॉइन BTC सारख्या इतर अनेक क्रिप्टोकरन्सीच्या किमतींवर परिणाम झाला.
युट्युबर केएसआयने याविषयी माहिती दिली आहे. “एकेकाळी मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो, पण नंतर मी स्वतः स्वत:ची काळजी घेतली. स्वत:ला समजावलं की काही हरकत नाही, फक्त पैसे गेलेत मी अजून जिवंत आहे. पैशापेक्षा कुटुंब आणि मित्रांना महत्त्व द्यायचं ठरवलं. क्रिप्टो मार्केटमधून मी खूप काही शिकलो आहे”, असं केएसआयने सांगितलं आहे.
KSI एक प्रसिद्ध YouTuber आहे. 2009 मध्ये त्यांने यूट्यूब चॅनल सुरू केलं. आता त्याच्या दोन YouTube चॅनेलवर त्याचे 36 दशलक्षाहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. त्याचे व्हिडिओ 8.6 अब्ज पेक्षा जास्त वेळा पाहिले गेले आहेत. त्याला रॅपर म्हणूनही ओळखलं जातं.