सोशल मीडियावर (social media) एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल (viral video) होत आहे. ज्यामध्ये वृद्ध जोडप्यामधील प्रेम (old couple love) पाहायला मिळतं. यामध्ये एक वृद्ध महिला रुग्णालयाच्या बेडवर झोपलेली दिसत असून त्यांच्यासमोर स्टूलवर पती बसले आहे. मात्र त्यांच्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहत असून ते रोखू शकत नाहीत. पतीला रडताना पाहून ती वृद्ध महिलाही रडू लागते. या व्हिडिओवर अनेक लोकांच्या कमेंट्स आल्या आहेत. फेसबुकवरही अनेकांनी ते शेअर केले आहे. त्याच वेळी, इन्स्टाग्रामवर 4.64 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
वर नमूद केल्याप्रमाणे या व्हिडीओवर लोक खूप कमेंट करत आहेत. यूजर्स त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनुभव सांगत आहेत. नैना नावाच्या युजर म्हणाली की, ‘ हा व्हिडीओ पाहून मलाही रडायला येत आहे आणि माझ्या आजोबांसाठी खूप वाईट वाटत आहे. गेल्या वर्षी माझी आजी त्यांना सोडून गेली. ते रोज तिची आठव काढतात. आपल्या लोकांना असं जाऊ देणं खूप कठीण असतं. शेवटी आपल्या हातात त्यांच्या फक्त आठवणी उरतात’.
या व्हिडीओवर प्रतिक्षा नावाच्या युजरनेही कमेंट करत तिच्या मनातले भाव सांगितले आहेत. ‘ (माझी) आई गेल्यानंतर मी वडिलांनाही याच अवस्थेत पाहिलंय. हे (व्हिडीओ) पाहून मन खरंच खूप दुखावलं गेलंय. आपण आयुष्यात नेहमी आपल्या पालकांचा आदर , मान राखला पाहिजे. त्यांच्यासाठी वेळ काढला पाहिजे. आयुष्याचा काहीच भरोसा नाहीये. पालकांचं मन कधी दुखवून नका रे… ‘ अशा आशयाची कमेंट तिने केली .
आजी आजोबांची सांगितली गोष्ट
आंचल नावाच्या युजरने सांगितले की, ‘माझ्या आजीचे गेल्या वर्षी निधन झाले. माझे आजोबा रडत होते. संपूर्ण अंत्यसंस्कारात मला त्यांना आधार द्यायचा होता, पण त्यांच्या आयुष्यातील पोकळी भरून काढण्यासाठी मी काहीच करू शकले नाही . आजोबा नेहमी म्हणतात, स्वर्गात घेऊन जायला ती ( आजी) नक्की येईल, अशा स्वरूपात तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मीरा मज नावाच्या युजरनेही यावर कमेंट केली आहे. तिने लिहिले की, ‘आपल्या आजी-आजोबांनी वयाच्या 14 किंवा 15 व्या वर्षी एकमेकांशी लग्न केले होते. आणि मग आपापसात प्रेमाचे बंध निर्माण झाले. त्यांनी एकमेकांना वाढताना, दुःखात, सामंजस्यात, कठीण काळात एकत्र पाहिले आहे, परंतु कधीही वेगळे होण्याचा प्रयत्न केला नाही. आणि आता ते त्यांच्या 70, 80 किंवा 90 व्या वयात आहेत. यापैकी एखाद्याला त्याच्या दीर्घकाळाच्या जोडीदाराला त्यांच्या मृत्यूशय्येवर पाहून कसं वाटत असेल याची कल्पना करा. हे खूप दुःखदायक आहे.’