नवी दिल्ली : जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही ! आनंद चित्रपटातला हा संवाद (dialouge) आपल्या सगळ्यांनाच माहीत असेल. जीवनाचं संपूर्ण सार या एका वाक्यात आनंद सांगून जातो. आपल्या आयुष्यातील क्षण असे जगा की ते आयुष्य लहान असो वा मोठं, भरभरून जगण्याची मजा आली पाहिजे. हेच वाक्य सिद्ध करणारा एक व्हिडीओ (video) वेगाने व्हायरल होत आहे. एका फंक्शनमध्ये एक काका (old man performed dance on song) ऐश्वर्या रायच्या गाण्यावर ठेका धरत जबरदस्त डान्स सादर करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. Age is just a number! हे वाक्य या काकांना बघून खरंच पटतं. वयाचा आणि तुमच्या कॉन्फिडन्सचा, उत्साहाचा काहीही संबंध नाही.
लग्नात किंवा एखाद्या पार्टीत जेव्हा जेव्हा लोकांना संधी मिळते तेव्हा ते खुलेपणाने नाचतात. लहान मुले असोत की वडीलधारी व्यक्ती, प्रत्येकजण फक्त स्टेज शोधतो आणि संधी मिळताच आपला परफॉर्मन्स सादर करतात. आता ही क्लिप तुम्हीच पाहू शकता, ज्यामध्ये एक वयस्कर व्यक्ती असा डान्स करताना दिसत आहे, जे पाहिल्यानंतर आजच्या तरुणांनाही त्यांच्या फिटनेसची लाज वाटेल. या व्यक्तीच्या कामगिरीत एक वेगळीच ऊर्जा आणि उत्साह आहे. जे पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
इथे पहा व्हिडीओ
जेव्हा एखादा माणूस आनंदी असतो तेव्हा तो मनमोकळेपणाने नाचतो आणि संधी मिळाली तर तो स्टेजवरही धमाका करू शकतो, असे म्हणतात. साधारणपणे ज्या वयात माणसे नीट उठून बसू शकत नाहीत. या वयात ते काका ज्या पद्धतीने नाचत आहेत ते खरोखरच आश्चर्यकारक आहे. त्यांचा डान्स बघून असं वाटतंय की ते जणू काही एक प्रोफेशनल डान्सर आहेत ! या काकांचा डान्स पाहून प्रत्येक व्यक्ती आश्चर्यचकित झाली होती. या वयात त्याच्या एनर्जी आणि स्टॅमिनाचे रहस्य काय आहे, असा प्रश्नही अनेकांना पडला.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर aylogyworld नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. तो पाहिल्यानंतर हजारो लोकांनी तो व्हिडीओ लाइक केला आहे. अनेक युजर्सनी व्हिडिओवर आपली प्रतिक्रियाही नोंदवली. एका यूजरने सांगितले की, हा डान्स खरोखरच छान आहे. त्याचवेळी आणखी एका युजरने लिहिले की, अशा डान्ससाठी खूप धैर्याची गरज असते. तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ बघा आणि तो कसा वाटला, हे नक्की सांगा.