मुंबई : इंटरनेट एक असं माध्यम आहे, तिथं काहीही व्हायरल होऊ शकतं. त्यामुळे हे सांगणं अधिक गरजेचं आहे की, लोकांच्या नजरेतून तुमची एक सुध्दा चुकी राहू शकत नाही. तुम्हाला असं वाटतं असेल की आज हा विषय का काढलाय ? कारण आईफा अवॉर्ड्स (IIFA Awards) मध्ये सोनम कपूरने (Sonam Kapoor) एक परफॉर्मेंस केला होता. तो जुना व्हिडीओ (old video of Sonam Kapoor) पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ते सुद्धा काही चुकीच्या कारणामुळे…
व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये वैभव नावाच्या व्यक्तीने ट्विटरवरती एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओत सोनम कपूर लहंगा घालून ससुराल गेंदा फूल पर डांस करतं असल्याचं दिसत आहे. आईफा अवॉर्डच्या कार्यक्रमात परफॉर्म करीत आहे. त्या व्हिडीओत अनिल कपूर आणि बिपाशा बसू देखील आहे.
पोस्टमध्ये असं लिहिलं आहे की, पाच वर्षाची मुलगी एका शाळेच्या कार्यक्रमात परफॉर्म करीत आहे.
आतापर्यंत त्या व्हिडीओला १ लाख लोकांनी पाहिलं आहे. ट्विटर यूजर्संना सुध्दा सोनम कपूरचा तो परफॉर्मेंस अजिबात आवडलेला नाही. एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, अशा पद्धतीचा गाणं फक्त तिच्या आई आणि वडिलांना आवडू शकतं. दुसरा नेटकरी म्हणतो की, एक मुलगी संगीत गाण्यावर डान्स करीत आहे.
5 year old me performing at school function pic.twitter.com/ktHUGheVVj
— Vaibhav (@Crazen_forever) March 28, 2023
ससुराल गेंदा फूल हे रेखा भारद्वाज, श्रद्धा पंडित, सुजाता मजुमदार आणि व्हीएन मेहती यांनी गायले होते.
सध्या सोशल मीडियावर विविध प्लॅटफॉर्मवरती काहीही व्हायरल होऊ शकत अशी स्थिती आहे. त्यामुळे जुन्या गोष्टी अनेक व्हायरल झालेल्या पाहायला मिळत आहेत.