मुंबई : सध्या सोशल मीडियावर विविध गोष्टी व्हायरल होत असतात. अनेकदा त्याची दखल समाजातील प्रतिष्ठित मंडळींकडून घेतली जाते. अश्याच एका व्हायरल व्हीडिओवर प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आनंद महिंद्रा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टींवर बोलत असल्याचं पाहायला मिळतं. सध्या एका सायकल वर बसून दोन मुलं प्रवास करतानाचा व्हीडीओ व्हायरल होत आहे. एका सायकलवरून दोघांनी प्रवास करणं जरी आपल्यासाठी नवीन नसेल तरी एकाच वेळी दोघांनी सायकल (Bicycle Viral Video) चालवणं हे मात्र विशेष आहे. त्याची दखल आनंद महिंद्रा यांनी घेतली आहे.
सध्या एका सायकल वर बसून दोन मुलं प्रवास करतानाचा व्हीडीओ व्हायरल होत आहे. एका सायकलवरून दोघांनी प्रवास करणं जरी आपल्यासाठी नवीन नसेल तरी एकाच वेळी दोघांनी सायकल चालवणं हे मात्र विशेष आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे अनेकांनी आपल्या अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर केलाय.
या दोन मुलांनी हा सायकल चालवतानाचा व्हीडिओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनाही भावलाय त्यांनी हा व्हीडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलाय. याला त्यांनी “हा व्हीडिओ सर्वांसाठी प्रेरणणादायी आहे. कुठल्याही मोठ्या युनिव्हासिटीमध्ये असं सहयोग आणि टीमवर्क शिकवलं जात नसेल. टीमवर्कचं महत्व सांगणारा यापेक्षा चांगला व्हिडिओ नसेल! अश्या एकजुटीची भारताला गरज आहे”, असं आनंद महिंद्रा म्हणाले आहेत.
Even Harvard Business School would not have a better video to communicate the virtues of collaboration & teamwork! pic.twitter.com/ALBRYRCFN0
— anand mahindra (@anandmahindra) April 23, 2022
काही दिवसांआधी एक व्हीडीओ व्हायरल झाला होता. यात सायकल चालवणाऱ्यानं आपल्या डोक्यावर मोठं गवताचं ओझं ठेवलंय. दोन्ही हातांनी हे ओझं त्यानं पकडून ठेवलंय. दोन्ही हात वर आहेत, डोक्यावर गवताचं ओझं आहे, आणि अशा अवस्थेत हा माणूस वळणावळण्याच्या रस्त्यावर सायकल चालवताना दिसतोय. या व्हीडिओवरही आनंद महिंद्रा यांनी प्रतिक्रिया दिली होती. “सायकल चालवणारा हा माणूस अद्भूत आहे. या माणसाची बॉडी जबरदस्तच आहे. त्याचा सायकलवरील बॅल्सही वाखाण्याजोगा आहे. पण एका गोष्टीची मला खंत वाटतेय. याच्यासारखे असे अनेक कर्तबगार आणि टॅलेंटेड लोकं आपल्या देशात आहेत. पण त्यांची ना कुणी दखल घेतंय, आणि त्यांना कुणी दाद देतंय…”, असं आनंद महिंद्रा म्हणाले होते.
This man is a human Segway, with a built in gyroscope in his body! Incredible sense of balance. What pains me, however, is that there are so many like him in our country who could be talented gymnasts/sportspersons but simply don’t get spotted or trained… pic.twitter.com/8p1mrQ6ubG
— anand mahindra (@anandmahindra) March 29, 2022
संबंधित बातम्या