Shocking ! एका चिप्सने मुलाचा जीवच घेतला, तुम्ही तर असं करत नाही ना ?

| Updated on: Sep 06, 2023 | 3:00 PM

One Chip Challenge : हे धक्कादायक प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. वन चिप चॅलेंजनंतर त्या अल्पवयीन मुलाने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या आईला जबर धक्का बसला असून रडून-रडून तिची अवस्था वाईट झाली आहे.

Shocking ! एका चिप्सने मुलाचा जीवच घेतला, तुम्ही तर असं करत नाही ना ?
प्रातिनिधीक फोटो
Image Credit source: freepik
Follow us on

One Chip Challenge : सोशल मीडियावर एखादा ट्रेंड (trend on social media) आला रे आला की लोकं लगेच त्यात भाग घेतात. मात्र त्याचा परिणाम चांगला होईल की वाईट याचादेखील कुणीच विचार करत नाही. टिकटॉकचा असाच एक ट्रेंड अवघ्या 14 वर्षांच्या मुलाच्या जीवावर बेतला. या मुलाने कथितरित्या ‘वन चिप चॅलेंज’मध्ये (one chip challenge) भाग घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र त्यानंतर त्याच्या पोटात एवढ्या तीव्र वेदना सुरू झाल्या की त्याला लगेचच हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करेपर्यंतच त्याने अखेरच श्वास घेतला. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, परंतु मुलाच्या आईचे म्हणणे आहे की त्याने तिखट आणि मसालेदार चिप्स खाल्ले होते.

नेमकं काय झालं ?

हे प्रकरण अमेरिकेतील मॅसाच्युसेट्स येथील आहे. हॅरिस असे त्या मृत मुलाचे नाव असून त्याच्या आईच्या सांगण्यानुसार, त्याने शाळेत हे प्राणघातक चॅलेंज स्वीकारले होते. तिखट चिप्स खाताच त्याच्या पोटात भयंकर दुखू लागलं. त्याच्या आईला याबाबत कळताच तिने तातडीने शाळेत धाव घेतली मात्र तोपर्यंत हॅरिसची तब्येत खूपच खालावली होती. घरी आणेपर्यंतच तो बेशुद्ध झाला होता. त्याला तेथून तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. चिप्स खाल्ल्यानेच आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचे हॅरिसच्या आईचे म्हणणे आहे.

काय आहे वन चिप चॅलेंज ?

2016 साली हे चॅलेंज सुरू झालं होतं. मात्र सोशल मीडियाच्या प्रसारानंतर तरूणांमध्ये हे चॅलेंज खूपच वेगाने लोकप्रिय झाले. ते चॅलेंज स्वीकारणाऱ्या व्यक्तीला जगातील सर्वात तिखट मिरचींपैकी एक असलेल्या कॅरोलिना रीपर मिरची असलेला एक चिप्स किंवा वेफर खायचा असतो.मात्र ते खाल्ल्यानंतर पाणी . इतर पदार्थ किंवा कोणतही पेय पिण्यास मनाई आहे. सहभागी व्यक्तीला त्या चिप्सचा तिखटपणा सहन करत ते खातानाचे शूटिंगही करायचे असते.

Paqui या कंपनीने या चिप्सचे उत्पादन केले आहे. मात्र आमचा (या ट्रेंडमागचा) उद्देश फक्त मार्केटिंग हा होता. ही मिरची असलेला एक चिप्सही खाल्ल्याने शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात, असेही कंपनीने आपल्या वेबसाइटवर स्पष्टपणे लिहिले आहे. ते खाल्ल्यानंतर व्यक्तीला कोणत्याही प्रकारची अस्वस्थता, मळमळ किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, अशी समस्या जाणवत असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जावे, असा इशाराही देण्यात आला आहे.