दिल्ली : आपल्यापैकी असे अनेक लोक आहेत, जे ऑनलाईने ( ONLINE ) जेवण, तसेच अन्य पदार्थ मागवतात. यामुळे लोकांना कुठेही न जाता अगदी घरबसल्या कोणत्याही वेळी जेवण मागवता येतं. यासाठी फास्टेस डिलीव्हरी करण्यासाठी सध्या अनेक कंपन्या प्रसिद्ध आहेत. यावर लोकांना चांगला डिस्काउंट आणि ऑफर ( OFFER ) मिळते. म्हणून तर मोठ्याप्रमाणात लोक या मोबाईल ऍप्सवरुन ( MOBILEAPP ) जेवण मागवतात. परंतु फूड डिलिव्हरी ( FOOD ) कंपनीने मोठा पराक्रम केला आहे, ऑनलाईन सेवेचा वापर करताना एकाने ब्रेड मागवला असताना त्याला कंपनीने ब्रेड तर पाठवलाच परंतू या ब्रेडच्या पाकीटात चक्क जीवंत उंदीर पाठविल्याने त्याला धक्का बसला आहे.
कोणतीही जीवनावश्यक वस्तू ऑनलाईन मागविण्याच्या सेवेमुळे जीवन अगदी सोपे आणि वेगवान झाले आहे. परंतू या फास्ट लाईफमध्ये काही हादरवणारे अनुभव देखील येत असतात. असाच एक भयानक आणि आयुष्यभर लक्षात राहिल असा अनुवभ एकाने ट्वीटरवर शेअर केला आहे. नितीन अरोरा यांनी त्यांच्यासाठी ऑनलाईन वस्तू विकणाऱ्या ब्लिकीट कंपनी मार्फत ब्रेडची ऑर्डर केली होती. परंतू जेव्हा कंपनीने त्यांनी डीलव्हरी दिली तेव्हा ब्रेड पाहून त्यांना धक्काच बसला. कारण कंपनीने त्यांना ब्रेडसोबत चक्क जीवंत उंदीरही पाठवून दिला !
नितीन अरोरा या ट्वीटर युजरने ट्वीटरवर त्यांना मिळालेल्या ब्रेडच्या पाकीटात जीवंत उंदीर असल्याचा फोटो ट्वीट केला आहे. ऑनलाईन सेवेत वस्तू झटपट मिळाल्याने ग्राहकांना दिलासा मिळत असतो. परंतू आपण जेव्हा आपल्याला डिलिव्हरी झालेले ब्रेडचे पाकीट पाहीले तेव्हा आपल्या आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव मिळाला. पाकिटात जीवंत उंदीर असेल असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. हा अनुभव कायम लक्षात राहील असे त्यांनी म्हटले आहे.
Most unpleasant experience with @letsblinkit , where alive rat was delivered inside the bread packet ordered on 1.2.23. This is alarming for all of us. If 10 minutes delivery has such baggage, @blinkitcares I would rather wait for a few hours than take such items.#blinkit #zomato pic.twitter.com/RHNOj6tswA
— Nitin Arora (@NitinA14261863) February 3, 2023
आपल्या काही मिनिटांत वस्तू डिलीव्हर होतात. त्यामुळे आनंद आहे. परंतू या अनुभवानंतर आपण आता काही मिनिटांऐवजी तासभर थांबायलाही तयार आहे, परंतू असे काही आपल्याला मिळायला नको अशी प्रार्थनाच त्यांनी केले आहे. या जीवंत उंदीर असलेल्या ब्रेडच्या पाकीटाचा फोटो त्याने ट्वीटर खात्यावर शेअर केला आहे, त्यांनी या सोबत कंपनीच्या कस्टमर केअरशी झालेले संभाषणही शेअर केले आहे. त्यांनी या ब्रेडची ऑर्डर एक फेब्रुवारीला केली होती. ब्लिकीटच्या एक्झुकेटीव्हने दिलगिरी व्यक्त करीत हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून नेमकी काय गफलत झाली याची चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे.