मुंबई : मूळ क्रिकेटपटू असलेले इम्रान खान (Imran Khan) हे पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान झाले तेव्हा आणि त्यांना पदावरून पाय उतार व्हावं लागलं तेव्हा जगभरात जोरदार चर्चा झाली. 10 एप्रिलला इम्रान खान यांच्या हातून सत्ता गेली. मुस्लिम लीगचे अध्यक्ष शाहबाज शरिफ (Shahbaz Sharif) पंतप्रधानपदी विराजमान झाले. त्यामुळे सध्या पाकिस्तानात गोंधळाचं वातावरण आहे. सध्या रमजान महिना सुरू आहे. अश्यात पाकिस्तानात मुस्लिम बहुसंख्य असल्याने तिकडे रमजान उत्साहात साजरा केला जातो. अश्यात तिथला एक व्हीडिओ सध्या समोर आला आहे. ज्यात इम्रान खान आणि शाहबाज शरीफ यांचे कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हीडिओ इफ्तार पार्टी (Iftar Party) दरम्यानचा असल्याचं बोललं जातंय.
افطاری کرتے ہوئے آوازیں کسنے اور بدتمیزی کرنے پر مصطفی نواز کھوکھر اور نور عالم غصے میں آگئے،،
یہ ہم لوگوں کو کیا سکھا رہے ہیں؟؟ pic.twitter.com/W9SrPbYG6A— Waseem Abbasi (@Wabbasi007) April 12, 2022
सध्या रमजान महिना सुरू आहे. अश्यात पाकिस्तानात मुस्लिम बहुसंख्य असल्याने तिकडे रमजान उत्साहात साजरा केला जातो. अश्यात तिथला एक व्हीडिओ सध्या समोर आला आहे. ज्यात इम्रान खान आणि शाहबाज शरीफ यांचे कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हीडिओ इफ्तार पार्टी दरम्यानचा असल्याचं बोललं जातंय. या व्हीडिओत लोक एकमेकांवर वस्तू फेकताना पाहायला मिळत आहेत. तसंच मारहाण करतानाही पाहायला मिळत आहेत. या घटनेचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. मुस्लिम बहुसंख्य असलेल्या देशात इफ्तार दरम्यान अशी भांडणं होत असल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पाकिस्तानातील अलीकडच्या काळात राजकीय परिस्थिती खूपच अस्थिर झाली आहे. अलीकडेच पाकिस्तान इम्रान खान यांना अविश्वास ठराव मंजूर न केल्यामुळे पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले आहे, तर त्यांच्या जागी शाहबाज शरीफ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अश्यात या व्हीडिओची सध्या जोरदार चर्चा आहे.
افطاری کرتے ہوئے آوازیں کسنے اور بدتمیزی کرنے پر مصطفی نواز کھوکھر اور نور عالم غصے میں آگئے،،
یہ ہم لوگوں کو کیا سکھا رہے ہیں؟؟ pic.twitter.com/W9SrPbYG6A— Waseem Abbasi (@Wabbasi007) April 12, 2022
10 एप्रिलला इमरान खान यांचे सरकार पडले. दरम्यान इमरान खान यांच्याविरोधात नॅशनल असेंबलीमध्ये अविश्वास ठरावर मतदान झाले. ज्यामध्ये इमरान खान यांच्या पदरात हार आली. आणि त्यांना पंतप्रधान पदावरून पाय उतार व्हावे लागले. त्यानंतर पाकिस्तानमध्ये मुस्लिम लीगचे अध्यक्ष शाहबाज शरिफ यांना पंतप्रधान बनवण्यात आले आहे. तर इमरान खान यांचे सरकार पडण्यामागे त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची साथ सोडणे आहे. तर विशेषबाब म्हणजे इमरान खान हे पाकिस्तानच्या इतिहासातील पहिले असे पंतप्रधान आहेत ज्यांना अविश्वास ठरावामुळे पंतप्रधान पदावरून पाय उतार व्हावे लागले. तर इमरान खान हे पाकिस्तानच्या इतिहासातील पहिले असे पंतप्रधान आहेत ज्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला आहे.
संबंधित बातम्या