मुंबई : सोशल मीडियावर (Jugaad Trending Video) रोज असंख्य व्हिडीओ पाहायला मिळतात. जे व्हिडीओ हटके आहेत, किंवा त्या व्हिडीओमध्ये वेगळं काहीतरी आहे, असे व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) अधिक व्हायरल होतात. तुमची जुनी गाडी काही दिवसांनी तुम्हाला छोटी वाटते. कारण घरातील लोकांची संख्या अधिक असते. लहान मुलांना गाडीत अॅडजस्त करत प्रवास करणं अधिक अवघड असतं, असं अनेकदा दिसून आलं आहे. मोठ्या लोकांना गाडीत अधिक व्यवस्थित बसता यावं यासाठी पाकिस्तानमधील (Pakistan Viral Video) एका परिवाराने मोठा जुगाड केला आहे. विशेष म्हणजे हा जुगाड केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये पाकिस्तानच्या कुटुंबियांनी कारमध्ये बसण्यासाठी एक जुगाड केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. व्हिडीओत तुम्हाला पाहायला मिळत आहे की, अनेक गाड्या इकडून-तिकडून जात आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. तर अनेकांनी वाईट प्रतिक्रिया दिल्या आहेत. गाडीच्या मागे असलेल्या डिक्कीत त्यांनी बदल करुन मुलांना बसवलं आहे. त्या डिक्कीत तीन मुलं बसली आहेत. त्या मुलाची दिशा गाडीच्या विरुद्ध बाजूला करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुलांना सुरक्षा म्हणून एक जाळी लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही गाडी लांबून जेलसारखी वाटतं आहे.
पाकिस्तानमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Pakistan Viral Video) आल्यानंतर लगेच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ कराचीमधील असल्याचं एका वेबसाईटनं म्हटलं आहे. ज्यावेळी लोकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला त्यावेळी अनेकांना धक्का बसला आहे. त्याचबरोबर लोकांनी प्रत्यक्ष कार पाहिली त्यावेळी लोकं जाग्यावर थांबली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तीन मुलांना जेलमध्ये ठेवल्यासारखे वाटतं आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसल्याचं लोकांनी कमेंटच्या माध्यमातून सांगितलं आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला ते आम्हाला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा.