VIDEO | बाबांनी मुलाला बेसिनमध्ये अंघोळ घातली, त्याच पाण्याने भांडीही धुतली, हुशारी पाहून नेटकऱ्यांना राग आला, म्हणाले…

| Updated on: May 06, 2023 | 8:35 AM

VIRAL VIDEO | व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक व्यक्ती दिसत आहे. तो त्याच्या मुलाला अंधोळ सुध्दा घालत आहे आणि तिथेचं भांडी घासत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून नेटकऱ्यांना प्रचंड राग आला असल्याचं दिसत आहे.

VIDEO | बाबांनी मुलाला बेसिनमध्ये अंघोळ घातली, त्याच पाण्याने भांडीही धुतली, हुशारी पाहून नेटकऱ्यांना राग आला, म्हणाले...
Social Media Viral Video (1)
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल (Social Media Viral Video) झालेले पाहायला मिळतात. काही लोकं मुद्दाम व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होण्यासाठी तयार करीत असल्याचं पाहायला मिळतं. तर काही व्हिडीओ खरे असतात, ते नकळत कोणीतरी शुट केलेले असतात. असे व्हिडीओ सोशल मीडियावर लोकांना आवडल्यानंतर प्रचंड व्हायरल होतात. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती आपल्या बेसिनच्या भांड्यात आंधोळ घालत (Trending News) आहे, त्याचबरोबर भांडी सुध्दा धुत आहे. विशेष म्हणजे काही लोकांना हा व्हिडीओ आवडला आहे. तर काही लोकांना हा व्हिडीओ अजिबात आवडलेला नाही. काही लोकांनी वडिलांवर संताप व्यक्त केला आहे.

भांडी धुतलेल्या पाण्याने मुलाला अंधोळ घालत आहे

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक वडील भांडी धुतलेल्या पाण्याने मुलाला अंधोळ घालत आहे. हा व्हिडीओ पोस्ट केल्यापासून सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकांना धक्का देखील बसला आहे. व्हायरल झालेला हा व्हिडीओ Figensport नावाच्या एका व्यक्तीने ट्विटरवरती शेअर केला आहे.

हे सुद्धा वाचा

व्हिडीओ 1 लाख 58 हज़ार लोकांनी पाहिला

हा व्हिडीओ 1 लाख 58 हज़ार लोकांनी पाहिला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओला लोकांच्या विविध प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करताना म्हटले आहे की, मला असा क्रिएटिव्ह पिता का नाही मिळाला? दुसर्‍या नेटकऱ्याने कमेंट करताना लिहिले आहे की, ‘आता ते पाहिले जात आहेत,ना मुलाची नीट साफसफाई होते ना भांडी’.

सोशल मीडियावर अशा पद्धतीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया येतात. सध्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे, त्याचबरोबर वाईट प्रतिक्रिया दिल्या आहेत.