पॅरिस ऑलिम्पिकमधील हा फोटो का होत आहे व्हायरल,दोन दिवसात सहा कोटी लाईक्स…

| Updated on: Aug 01, 2024 | 9:02 PM

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये भरलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत जगाचे लक्ष लागून राहीले आहे. या ऑलिम्पिकमध्ये यावेळी 32 खेळांचे विविध 329 इव्हेंट होणार आहेत. जगभरातील 206 नॅशनल ऑलिम्पिक समित्यांचे एथलिट या स्पर्धात उतरले आहेत.

पॅरिस ऑलिम्पिकमधील हा फोटो का होत आहे व्हायरल,दोन दिवसात सहा कोटी लाईक्स...
Photographer Jérôme Brouillet photo of Brazilian surfer Gabriel Medina
Follow us on

भारताने पॅरिसमधील ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत आतापर्यंत तीन कास्यं पदकांची कमाई केली आहे. भारताला ही तीन कास्य पदके नेमबाजी खेळात मिळाली आहेत. या जगभरातील खेळाडूंच्या कुंभमेळ्यातील प्रत्येक क्षण टिपण्यासाठी जगभरातील छायाचित्रकार, प्रसारमाध्यमे जीवाचा अगदी कान करीत आहेत. अशात सोशल मिडीयात एक फोटो व्हायरल होत आहे. गेल्या दोन दिवसात या फोटोला सहा कोटी लोकांनी लाईक्स केले आहे. हा फोटो घेतलेला क्षण खास आहे. कोट्यवधी युजरने हा फोटो पाहीला आहे. या फोटोत एक एथलीट हवेत लटकेला दिसत आहे. काय आहे या फोटो मागील रहस्य जाणून घेऊयात….

ब्राझीलचा सर्फींग स्टारचा फोटो व्हायरल

सोशल मिडीयावर व्हायरल होणारा फोटो ब्राझील सर्फर गेब्रिएल मदीना याचा आहे. या फोटो ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुष सर्फिंगच्या तीन राऊंडमध्ये टिपण्यात आला आहे. ज्या फोटोग्राफरने हा क्षण टिपला त्या फोटोग्राफरचे नाव जेरोम ब्रोयलेट आहे. ते एएफपी न्यूज़ एजन्सीचे छायाचित्रकार आहेत. त्यांनी हा फोटो ज्या क्षणाला घेतला त्यावेळी गेब्रियल मदीना हवेत आपल्या डाव्या हाताने बोर्डला सांभाळत वर आकाशात इशारा करीत होते.

हाच तो पॅरिस ऑलिम्पिक मधील लक्षवेधी फोटो –

हा फोटो क्लीक करणारे छायाचित्रकार जेरोम ब्रोयलेट यांनी हा फोटो गाजल्यानंतर म्हणाले की,’ हा फोटो पाहून मी स्वत:च हैराण झालो आहे. हा फोटो त्या क्षणी घेतला ज्यावेळी समुद्राच्या लाटा उंचच उंच उफाळत होत्या. अशा वेळी कोणताही फोटो काढणे अवघड असते. परंतू मी या कठीण स्थितीचा फायदा घेतला आणि चार फोटो एका क्षणात क्लीक केले. त्यापैकी एक फोटोची पोझ अशी क्लीक झाली.’

सहा कोटी लोकांनी लाईक्स

या फोटोला इंस्टाग्रामवर आतापर्यंत सहा कोटी लोकांनी लाईक्स केले आहे. फोटोग्राफर जेरोम ब्रोयलेट याने क्लीक केलेल्या या अनोख्या छायाचित्राला ब्राझीलीयन सर्फर गॅब्रियल मदीना याने स्वत:च्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहे. हा फोटो जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला असे वाटेल की मदीना हे हवेत उडत आहेत, जेरोम ब्रोयलेट यांच्या या छायाचित्रालाची खूपच प्रशंसा केली जात आहे. टाइम्स मॅगझीन देखील फोटोग्राफर जेरोम ब्रोयलेट यांच्या या फोटो छायाचित्राचे कौतूक केले आहे. तसेच साल 2024 चा उत्कृष्ट छायाचित्र म्हणून त्याचा गौरव केला आहे.