Russia Ukraine war : गेल्या 4 दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून, त्यात हजारो सैनिक मारले गेल्याचा दावा दोन्ही बाजूंकडून केला जात आहे. विशेषतः युक्रेनची स्थिती अतिशय वाईट आहे. येथे रशियन (Russian) सैन्य ठिकठिकाणी क्षेपणास्त्रे (Missiles) टाकत आहे, ज्यामुळे लोकांची घरे उद्ध्वस्त (Destroyed) होत आहेत. दोन देशांच्या युद्धात गरीब नागरिक चिरडले जात आहेत. रशियन सैन्य युक्रेनमध्ये खोलवर घुसले आहे आणि शहरांमध्ये कहर करत आहे. निवासी इमारतींवर क्षेपणास्त्रे डागली जात असून, त्यामुळे इमारतींची दुरवस्था झाली आहे. अशा स्थितीत युक्रेनमधून एक अत्यंत वेदनादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही लोक निवासी इमारतींच्या बाहेर त्यांच्या घरांचा ढिगारा गोळा करताना दिसत आहेत. हे दृश्य हृदय हेलावणारे आहे, लोकांनी पैसे जोडून कसे घर केले असेल आणि ते एका फटक्यात उद्ध्वस्त झाले असेल, याची कल्पना वेदनादायी आहे.
क्षेपणास्त्रांमुळे उंच इमारतींची स्थिती वाइट
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की क्षेपणास्त्रांमुळे उंच इमारतींची वाइट स्थिती झाली आहे आणि लोक बाहेर कचरा गोळा करताना दिसत आहेत. लाकूड, लोखंड उचलून वाहनांमध्ये ठेवले जात आहे. त्याचवेळी क्षेपणास्त्र हल्ल्यातून वाचलेली लहान मुले सैरभैर झालेली पाहताना अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. हे एक अतिशय वेदनादायक दृश्य आहे. ज्यांची घरे कुठलीही चूक नसताना उद्ध्वस्त होतात त्यांची वेदना तुम्ही समजू शकता.
ट्विटर हँडलवर शेअर
हा वेदनादायक व्हिडिओ आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, की जिथे क्षेपणास्त्रे पडली, तिथे लोक आता त्यांच्या घरांचा ढिगारा गोळा करत आहेत, लहान मुले जवळच दिसत आहेत. युद्धाचा मुलांवर खूप परिणाम होतो. कोणत्याही मुलाने युद्धाचे दिवस पाहू नयेत आणि सर्व समस्यांवर शांततापूर्ण तोडगा निघावा, अशी इच्छा आहे.
‘अत्यंत हृदयद्रावक’
45 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे, तर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूझरने लिहिले, की दुर्दैवाने लाखो मुलांसाठी, युद्धाची भीषणता ही सामान्य इको-सिस्टम आहे, कारण त्यांनी याशिवाय दुसरे काही पाहिले नाही’, तर दुसऱ्या यूझरने लिहिले आहे, की हा एक हृदयद्रावक व्हिडिओ आहे.
जहाँ मिसाइलें गिरीं, वहां अब लोग अपने आशियाने का मलबा समेट रहे हैं, बच्चे पास में झूला झूल रहे हैं.
युद्ध का बच्चों पर बड़ा दुष्प्रभाव पड़ता है. काश किसी बच्चे को युद्ध के दिन ना देखना पड़े, व हर मसलों का शांतिपूर्ण समाधान हो.#RussiaUkraineWar #PeaceNotWar pic.twitter.com/NmI0PKa4F9
— Dipanshu Kabra (@ipskabra) February 26, 2022
आणखी वाचा :