मुंबई : सोशल मीडियावर (Social media) कधी काय व्हायरल होईल हे कुणीचं सांगू शकत नाही. कोणी हेलिकॉप्टर तयार करतंय, तर कोणी इलेक्ट्रीक स्कुटर (electric scooter) तयार करीत आहे. तर कोणी व्हायरल होण्यासाठी चुकीच्या पद्धतीने व्हिडीओ तयार करीत आहे. सध्या सोशल सोशल मीडियावर मजुरांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. तर काही लोकांना हा व्हिडीओ (viral video) अधिक आवडला सुध्दा आहे. आतापर्यंत जेवढे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तेवढे लोकांना आवडले आहेत.
सध्याचा व्हिडीओ ट्विटरवरती @TansuYegen यांच्याकडून व्हायरल करण्यात आला आहे. त्या व्हिडीओमध्ये मजूर एका भिंतीचं काम करीत आहेत. तो व्हिडीओ जसा पुढे जात आहे, तशी त्या व्हिडीओमधील गंमत तुम्हाला पाहायला मिळत आहे. दोन कामगार लाकडाच्या पळीवर बसले आहेत. एक मजदूर वीट हातात देत आहे, तर दुसरा ती वीट भिंतीवर ठेवत आहे. हा व्हिडीओ लोकांना अधिक आवडला आहे. लोकांनी या व्हिडीओच्या खाली प्रतिक्रिया सुध्दा दिल्या आहेत.
Everything can be automated.., pic.twitter.com/VOow1m1b55
— Tansu YEĞEN (@TansuYegen) July 6, 2023
हा व्हिडीओ २.५ मिलियन लोकांनी अधिकवेळा पाहिला आहे. त्याचबरोबर त्यावर खूप साऱ्या प्रतिक्रिया सु्द्धा आल्या आहेत. मजदूर चांगली टेक्निक वापरत आहेत. त्या जुगाडमुळे कामाचं स्पीड वाढलं आहे. एका व्यक्तीने म्हटलं आहे की, मजदूर पूर्ण मेहनत करुन आपलं काम करु शकतात.
सोशल मीडियावर आतापर्यंत असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर ते लोकांच्या सुध्दा पसंतीला पडले आहेत. आनंद महिंद्रा यांनी अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियाच्या खात्यावरुन शेअर देखील केले आहेत.