मुंबई : रोज सोशल मीडियावर (Social Media) आपण काही गोष्टी पाहत असतो. काही गोष्टी चांगल्या असतात, तर काही गोष्टी भयंकर असतात, असं बऱ्याचदा पाहायला मिळत आहे. एक घटना अशी घडली आहे, की प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रियकराला (Love Affair) गावकऱ्यांनी पकडलं आहे. त्यानंतर एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याचा व्हिडीओ (VIDEO) सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला असून चांगला निर्णय घेतल्यामुळे गावकऱ्यांचं सगळी कौतुक करीत आहे.
ही घटना बिहार राज्यातील सीवान परिसरातील आहे. प्रियकर प्रेयसीला भेटायला आल्याची खबर गावकऱ्यांना लागली. त्यानंतर त्यांनी सापळा रचून प्रियकराला रंगेहात पकडला. त्यावेळी गावकऱ्यांनी एक मोठा निर्णय घेतला. दोघांचं हनुमानाच्या मंदीरात लग्न लावून दिलं.
उमाशंकर सिंह असं प्रियकराचं नाव आहे. ज्यावेळी गावकऱ्यांनी दोघांना रंगेहात पकडलं त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली होती. परंतु प्रियकराच्या कुटुंबियांनी प्रेयसीच्या परिवाराकडे एक लाख रुपयांचा हुड्डा मागितला होता. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी नकार दिला होता.
परंतु पुन्हा दोन दिवसांनी गावकऱ्यांनी हनुमान मंदिरात लग्न लावून दिले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.
प्रेम में दहेज बनी दीवार तो ग्रामीणों ने कराई शादी.वीडियो सीवान से है.प्रेमिका के साथ प्रेमी रंगे हाथों पकड़ाया.शादी के लिए लड़के वालों ने एक लाख दहेज मांगे.तब क्या था ग्रामीणों ने प्रेमी जोड़े का मिलन कराया.मंदिर में शादी करवाकर विदा कर दिया.वीडियो-सचिन. Edited by-@Sinhamegha8 pic.twitter.com/wLPsAkxBh8
— Prakash Kumar (@kumarprakash4u) December 21, 2022
नेमकं काय झालं
प्रेयसीने प्रियकराला भेटायला बोलावलं होतं. त्यावेळी अचानक गावकऱ्यांना दोघेही रंगेहात पकडले गेले. गावकऱ्यांनी दोघांच्या हिताचा निर्णय घेतल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. त्याचबरोबर लोकांनी दोघांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत.