मुंबई : “शादी करके फंस गया यार अच्छा खासा था बेचारा…” असं अनेकजण गाण बोलताना आपण पाहतो. त्या गाण्याता बॉलिवूडचा कॉमेडी किंग जॉनी लीवर (Johnny Lever) याने अनोखा डान्स (Viral dance) केल्यामुळे त्या गाण्याला आजही पूर्वीसारखचं महत्त्व आहे. त्याचबरोबर ते गाणं आजही लोकं आवडीने पाहतात हे मात्र विशेष आहे. ते गाणं व्हिडीओत (Monkey Viral Video) दिसत असलेल्या माकडावरती किती फिट होतंय पाहा.
लग्न झाल्यानंतर नवऱ्याने पत्नीची विविध कारणावरुन तक्रार केल्याचं पाहिलं असेल,पण माकडाने लग्न केल्यानंतर काय दु:ख झालंय हे ते व्हिडीओत दिसत आहे. तो माकडाचा व्हिडीओ पाहून अनेकांना वाईट वाटेल. माकड हा खूप जिद्दी प्राणी आहे. तो शैतानी करण्याचा मोका कधीचं सोडत नाही. ज्यावेळी दोन माकडांमध्ये शैतानी सुरु असते. त्यावेळी ते एकमेकांना किती परेशान करीत असतात हे अनेकदा पाहायला मिळालं आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेकदा लोकांना सुध्दा मारहाण केली आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये माकडाची अवस्था पाहून अनेकांना दु:ख वाटेल. त्या व्हिडीओमध्ये माकड भांडी उचलून उचलून घासत आहे. काहीवेळाने तिथं महिला येते आणि तिथं भांडा ठेवायला सुरुवात करते. व्हिडीओ पाहताना काही लोकांना असं वाटेल की माकडाला शिक्षा दिली आहे.
माकडाच्या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला एक आवाज सुरु आहे. त्यामध्ये माकडाची बायको माकडाकडून अधिक काम करुन घेते असं म्हटलं आहे. माकडं म्हणतं आहे की लग्न करुन फसलो आहे. माकड भांडी धुताणाचा व्हिडीओ तुम्ही पहिल्यांदा पाहिला आहे का ? हा व्हिडीओ ____arun____520 या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. तो व्हिडीओ लाखो लोकांनी लाईक केला आहे. व्हिडीओमध्ये कॅप्शन देण्यात आलं आहे बायकोच्या नादात…