तुमचा Blood Group कोणता आहे? ‘या’ रक्तगटाचे लोक असतात खूपच स्मार्ट?

| Updated on: Jul 27, 2022 | 11:31 PM

एखादा व्यक्ती किती हुशार आणि बुद्धिमान ब्लड ग्रुपवरुन जाणून घेऊ शकतो. प्रत्येकालाच असे वाटत असते आपण हूशार असावं आपल्या सारखी बुद्धी कोणाकडेच नसावी. मात्र, तुम्ही किती हुशार हे तुमच्या ब्लड ग्रुपवर अवलंबून आहे. कोणत्या ब्लड ग्रुपचे व्यक्ती जास्त स्मार्ट असतात याबाबत एक सर्वेक्षण करण्यात आले.

तुमचा Blood Group कोणता आहे? ‘या’ रक्तगटाचे लोक असतात खूपच स्मार्ट?
Follow us on

मुंबई : एखाद्या व्यक्तीचा स्वभाव घेण्यासाठी जाणून घेण्यासाठी त्याची आवड निवड इत्यादी गोष्टींची माहिती घेतली जाते. इतकच काहीतरी अनेक जण टॅरो कार्ड, ज्योतिष विद्या, हस्तरेखा आदी गोष्टींचा आधार घेतात. विशेषतः लग्नासाठी जोडीदार निवडताना त्याचा किंवा तिचा स्वभाव जाणून घेणे फारच गरजेचे असते. यामुळे स्वभाव जाणून घेण्यासाठी हे सर्व फंडे वापरले जातात. मात्र, आता ब्लड ग्रुप(blood group) वरून देखील तुम्ही तुमच्या होणाऱ्या साथीदाराचा स्वभाव जाणून घेऊ शकता. एका विशिष्ट रक्तगटाचे लोक खूपच स्मार्ट असतात. याची बुद्धी अत्यंत तल्लख असते.

एखादा व्यक्ती किती हुशार आणि बुद्धिमान ब्लड ग्रुपवरुन जाणून घेऊ शकतो. प्रत्येकालाच असे वाटत असते आपण हूशार असावं आपल्या सारखी बुद्धी कोणाकडेच नसावी. मात्र, तुम्ही किती हुशार हे तुमच्या ब्लड ग्रुपवर अवलंबून आहे. कोणत्या ब्लड ग्रुपचे व्यक्ती जास्त स्मार्ट असतात याबाबत एक सर्वेक्षण करण्यात आले.

बी पॉझिटिव्ह रक्तगट(B positive blood group)

कॅलिफोर्निया विद्यापीठात रक्तगटावर एक संशोधन करण्यात आले. सर्व रक्तगटांपैकी ‘बी पॉझिटिव्ह रक्तगट’ असलेल्या लोकांचा मेंदू सर्वात वेगवान असतो असे या संशोधनात आढळून आहे. बी पॉझिटिव्ह रक्तगटाच्या लोकांची विचारशक्ती इतर लोकांपेक्षा अधिक चांगली असते. बी पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या लोकांच्या मेंदूमध्ये पेरिटोनियल आणि टेम्पोरल लोबचे सेरेब्रम अधिक सक्रिय असतात, त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती तीक्ष्ण असते. त्यांचा मेंदू अधिक सक्रिय राहतो.

ओ पॉझिटिव्ह रक्तगट(O positive blood group)

बी पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्यांपाठोपाठ ओ पॉझिटिव्ह रक्तगट असलेले लोक बुद्धीमत्तेच्या बाबतील दुसऱ्या क्रमांकावर येतात. या लोकांचे मनही खूप तेज असते. या रक्तगटाच्या लोकांचे रक्ताभिसरण इतरांपेक्षा चांगले असते. त्यामुळे मेंदूमध्ये ऑक्सिजनचा प्रवाह चांगला राहून स्मरणशक्ती चांगली राहते.

यांचे मेंदू इतरांपेक्षा अधिक वेगवान

कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी रक्तगटाच्या संदर्भात एक संशोधन केले आहे. यामध्ये सर्व रक्तगटांच्या 69 लोकांचा अभ्यास करण्यात आला. या लोकांच्या रक्ताचे नमुने घेऊन संशोधन करण्यात आले आणि मानवी मेंदूबाबत माहिती गोळा करण्यात आली. या संशोधनात ‘बी पॉझिटिव्ह’ आणि ‘ओ पॉझिटिव्ह’ रक्तगटाच्या लोकांचा मेंदू इतरांपेक्षा वेगवान असल्याचे दिसून आले.