मुंबई – सोशल मीडियावर (Social media) पदवी झालेल्या विद्यार्थ्यांचा एक व्हिडीओ व्हायरल (Student viral video) झाला आहे. त्यामध्ये विद्यार्थी जोरात डान्स (Student Graduation Party Video) करीत आहेत, त्यावेळी अचानक जमीनीला भगदाड पडलं आणि सगळे विद्यार्थी त्यामध्ये गाडले गेले असल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसतंय. अनेकांनी हा व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहिला आहे. त्याचबरोबर कमकुवत मनाच्या लोकांनी हा व्हिडीओ पाहू नये अनेकांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे. सोशल मीडियावर असे रोज व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्या व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांच्या संख्या पंचवीस होती. त्याचबरोबर ते एका पार्टीत डान्स करीत होते. त्याचवेळी हा प्रकार घडल्यामुळे परिसरातील लोकांना मोठा धक्का बसला आहे. तिथं पार्टी पाहत असलेल्या एकाने मोबाईलमध्ये हा व्हिडीओ कैद केला आहे.
pop_o_clock या युझरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरती हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्यावरती एक आशय लिहिला आहे. त्यामध्ये पदवीधर विद्यार्थी पार्टी करीत असताना ही घटना घडल्याचं सांगत आहेत. त्याचबरोबर एकाचवेळी 25 विद्यार्थी कोसळल्याने पाहणाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर 28 हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. एकाने कमेंटमध्ये असं लिहिलं आहे की, एकाही विद्यार्थ्याला जखम झाली नसेल. पण अनेकांनी व्हिडीओ पाहून चिंता व्यक्त केली आहे.