VIDEO | बोकडासोबत करत होता मस्ती, सुरुवातीला गोल फिरवले, नंतर उचलून गटारात फेकले

| Updated on: Apr 18, 2023 | 12:11 PM

Viral Video | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती त्या बोकडासोबत मस्ती करीत आहे. त्यानंतर ते बोकड कशापद्धतीने शिक्षा देतंय हे व्हिडीओत पाहा.

VIDEO | बोकडासोबत करत होता मस्ती, सुरुवातीला गोल फिरवले, नंतर उचलून गटारात फेकले
Shocking Viral Video
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) काही असे व्हिडीओ पाहायला मिळतात की, त्यामधून लोकांना आनंद होतो. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना राग सुध्दा येतो. सध्या एका बोकडाला परेशान करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Shocking Viral Video) झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकजण त्यावर कमेंट करीत आहेत. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा सुरु आहेत. प्राण्यांना त्रास देत असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर नंतर प्राण्यांनी (Animal Video) त्यांना शिक्षा सुध्दा दिली आहे.

गल्लीत किंवा गावात फिरणाऱ्या भटक्या जनावरांचा अनेकांना सामना करावा लागतो. काही लोकं शांत असलेल्या जनावरांना मुद्दाम हुसकावण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे भटकी जनावरं त्या व्यक्तीवरती हल्ला करतात. सध्या अशाचं पद्धतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या चुकीच्या कर्माची फळं मिळत आहेत असं म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

बोकडाला करत होता परेशान

व्हायरल होत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर विविध प्लॅटफॉर्मवरती शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरती मोहम्मद कासिम कादरी यांनी आपल्या अकाऊंटवरती शेअर केला आहे. त्या व्हिडीओत एक पांढरा शर्ट घातलेला आणि लुंगी नेसलेला पुरुष दिसत आहे. तो व्यक्ती त्या बोकडाला परेशान करीत आहे. सुरुवातीला बोकडाने ताकदीच्या जोरावर त्या व्यक्तीला गोल फिरवले आहे. त्यानंतर ती व्यक्ती धावू लागते. ती व्यक्ती खाली पडल्यानंतर तो बोकड त्याला जोराची धडक घालतो.

व्हिडीओ दोन मिलियन लोकांनी पाहिला

त्या बोकडाला ज्यावेळी ती व्यक्ती सोडून पळू लागते. त्यावेळी बोकड आक्रमक होऊन त्याच्या मागे धावू लागतं. त्या व्यक्तीला इतक्या जोरात धडक घालते की, ती उचलून खाली पडते. ज्यांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. ते अजून हसत आहेत. 87 हजार लोकांनी त्या व्हिडीओला लाईक केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ दोन मिलियन लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओला आलेल्या मजेशीर कमेंट सुध्दा वाचण्यासारख्या आहेत.