Marathi News Trending Pet dogs have a expensive designer clothing collection they drink only bottled water
या कुत्र्यांचा थाट पाहिलात का?, फक्त बाटलीबंद पाणीच पितात, पोषाखामध्ये घालतात सोन्याचे जॅकेट
या कुत्र्यांसाठी एक महागड्या कपड्यांचा वॉर्डरोब तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये 50 डॉग आउटफिट्स आणि 70 बो टाय आहेत. या कुत्र्यांचा सर्वात महागडा पोशाख म्हणजे सोन्याचे जॅकेट आहे. ज्या जॅकेटची किंमत पाच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
1 / 5
अनेकांना प्राणी पाळायला आवडते, प्राण्यांमध्ये कुत्रा हा सर्वात जास्त पाळला जाणारा प्राणी आहे. त्यामागे कारण देखील तसेच आहे. कुत्रा हा त्याच्या इमानदारीसाठी ओळखला जातो. मालकावर एखादे संकट आले तर कुत्रा स्वत: चा जीव धोक्यात घालून मालकाचे संरक्षण करतो. अनेक जण आपल्या पाळीव कुत्र्याची काळजी घरातल्या सदस्यांप्रमाणे घेतात. मात्र अमेरिकेमध्ये असे दोन कुत्रे आहेत, ज्यांचा थाट हा एखाद्या श्रीमंत मानसांना लाजवेल असा आहे.
2 / 5
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हे कुत्रे फक्त बाटलीबंद पाणी पितात आणि महागडे कबाब खातात. ते कधीही साधे पाणी पित नाहीत, किंवा इतर कोणतेही अन्न खात नाहीत.
3 / 5
मिररच्या रिपोर्टनुसार, लिओन गेलर ह्या या कुत्र्यांचा मालकीण आहेत. त्यांनी या कुत्र्यांसाठी एक महागड्या कपड्यांचा वॉर्डरोब तयार केला आहे. या वॉर्डरोबमध्ये 50 डॉग आउटफिट्स आणि 70 बो टाय आहेत. या कुत्र्यांचा सर्वात महागडा पोशाख म्हणजे सोन्याचे जॅकेट आहे. ज्या जॅकेटची किंमत पाच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
4 / 5
कुत्र्यांना महागडे कपडे घालण्याची कल्पाना कशी सुचली याबाबत बोलताना लिओन यांनी सांगितले की, त्या एक टीव्ही शो पाहात होत्या, या शोमधूनच त्यांना कुत्र्यांसाठी महागडे कपडे घालण्याची कल्पना सुचली.
5 / 5
या कुंत्र्यांच्या ट्रेनिंगवर लाखो रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. विशेष म्हणजे तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या दोन्ही कुत्र्यांचे स्वतःचे इन्स्टाग्राम पेज (@romeo_reggie_adventures) देखील आहे, ज्यावर त्यांचे 14 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.