मुंबई : सध्या पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel Rate) दर गगनाला भिडलेत. त्यामुळे खिश्याला जबरदस्त कात्री लागलीये. सर्वसामान्य लोक त्रस्त आहेत. आज मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 120.51 रुपये तर डिझेल 104.77 लिटर आहे. सर्वसामान्य माणूस त्रस्त असताना एका जुगाडचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) होत आहे. यात त्यातल्या व्यक्तीला आता पेट्रोल 200 रूपये प्रतिलिटर झालं तरी फिकीर नाही. कारण त्याचा जुगाडच तसा कम्माल आहे. एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातल्या जुगाडने सध्या अनेकांचं लक्ष वेधलं आहे. या व्हीडिओत एक व्यक्ती पेट्रोल पंपवर पेट्रोल भरण्यासाठी येतो. तेव्हा त्याच्या मागे एक महिला बसलेली दिसत आहे. तर या टू-व्हीलरच्या मागे एक बैलगाडी जोडलेली दिसत आहे. त्यावर चक्क सहाजण बसलेले दिसत आहेत. त्यामुळे एका गाडीवर जर आठ जण प्रवास करत असतील तर त्या व्यक्तीला पेट्रोलचे दर कितीही वाढले तरी फरक पडणार नाही.
एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातल्या जुगाडने सध्या अनेकांचं लक्ष वेधलं आहे. या व्हीडिओत एक व्यक्ती पेट्रोल पंपवर पेट्रोल भरण्यासाठी येतो. तेव्हा त्याच्या मागे एक महिला बसलेली दिसत आहे. तर या टू-व्हीलरच्या मागे एक बैलगाडी जोडलेली दिसत आहे. त्यावर चक्क सहाजण बसलेले दिसत आहेत. त्यामुळे एका गाडीवर जर आठ जण प्रवास करत असतील तर त्या व्यक्तीला पेट्रोलचे दर कितीही वाढले तरी फरक पडणार नाही.
ही आयडिया कशी वाटली…#petrolPrice #Kolhapur #pune #mumbai #maharstra #india pic.twitter.com/W7ojy1YlLW
— SUNlL PATIL Journalist (@PatilSunilSakal) April 13, 2022
सुनील पाटील या व्यक्तीने हा व्हीडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हीडिओवर आता पेट्रोल 200 रूपये पार गेलं तरी फिकीर नाही, असं लिहिण्यात आलं आहे. तर कसा वाटला जुगाड असं या व्हीडिओला कॅप्शन देण्यात आलं आहे. या व्हीडिओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. अनेकांनी या व्हीडिओवर हसण्याच्या इमोजी शेअर करत या व्हीडिओची खिल्ली उडवली आहे.
आज कच्च्या तेलाच्या दरात तेजी दिसून येत आहे. कच्च्या तेलाचे (crude oil) दर 9 टक्क्यांनी वाढले असून, ते 111.23 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर 105.41 रुपये तर डिझेल 96.97 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 120.51 रुपये तर डिझेल 104.77 लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल, डिझेलचे भाव अनुक्रमे 115.12 आणि 99.83 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये आणि डिझेल 100.94 रुपये लिटर आहे.
संबंधित बातम्या