Animals Photo : इंटरनेटच्या जगात कधी, कुठे, काय व्हायरल होईल, हे आपण सांगू शकत नाहीत. सध्या इंटरनेटवर (Social media) एका फोटोने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. हा फोटो हरीण (Deer) आणि वाघाशी (Tiger) संबंधित आहे. या फोटोने जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. IFS अधिकारी रमेश पांडे देखील हा फोटो पाहून इतके प्रभावित झाले, की ते त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केल्याशिवाय राहू शकले नाहीत. आता तुम्ही विचार करत असाल, की या चित्रात इतके खास काय आहे, की त्याने जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. वाघ किती धोकादायक असतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तो एका झटक्यात आपली शिकार फाडून टाकतो. वाघाला पाहताच मोठ-मोठे प्राणीही पळून जातात. त्यामुळे मग जवळ येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
या चित्रात काही वेगळेच पाहायला मिळत आहे. वाघ आणि हरीण एकमेकांच्या अगदी जवळ उभे असल्याचे तुम्हाला पाहायला मिळेल. शिवाय शेजारी उभ्या असलेल्या हरणाची शिकार करण्यात वाघाला रस दिसत नाही. त्याचवेळी हरीणही वाघाजवळ आरामात आणि निर्धास्तपणे उभे राहिल्याने त्या भयंकर प्राण्याची त्याला भीती वाटत नाही, असे दिसत आहे. हा फोटो पाहून सोशल मीडिया यूझर्सचा डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. हा फोटो पाहा…
This is the reason why I call tiger a ‘striped monk’.
PC: Shared pic.twitter.com/rqA2agKnlB
— Ramesh Pandey (@rameshpandeyifs) March 18, 2022
आपल्या भक्ष्याला क्षणार्धात गतप्राण करणारा वाघ हरिणांना पाहून शिकार करायला विसरला, असे इंटरनेट यूझर्सचे म्हणणे आहे. वाघ आणि हरीण यांच्यात मैत्री असल्याचे काही लोक सांगत आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून काही लोक एक जुनी म्हण सांगत आहेत, ‘घोड्याने गवताशी मैत्री केली तर खाणार काय?’.