आयपीएलची (IPL 2022) आतापासूनच चहाते वाट पाहत आहेत. आयपीएलच्या 15 व्या हंगामाला एप्रिल महिन्यात सुरुवात होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण दहा टीम सहभागी होणार असून, 15 व्या हंगामात एकूण 74 मॅच खेळल्या जाणार आहेत. आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात झाली आहे. या लिलावामध्ये टॉपच्या खेळाडूंची कोट्यावधी रुपये देऊन खरेदी करण्यात येत असल्याचे पहायला मिळत आहे. या खेळांडूमध्ये भारताचा स्टार गोलंदाज आर अश्विन (R. Ashwin) याचा देखील समावेश आहे. अश्विनला राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) पाच कोटी रुपये देऊन खरेदी केली आहे. आर. अश्विन यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स आणि दिल्लीच्या संघात खेळला आहे. यावेळी मात्र तो राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसून येणार आहे. अश्विन राजस्थान रॉयल्सकडून खेळणार असल्याचे समजताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे. सेहवागने देखील अश्विनची चांगली फीरकी घेतली आहे.
यावेळी आर अश्विन आणि इंग्लडचा विकेटकिपर जोस बटलर हे दोघे एकाच संघात असणार आहेत. यावरून सेहवागने मजेदार मीम्स शेअर केले आहे. सेहवागने अश्वीनची फीरकी घेताना जोस बटलर याने अश्विनला मांकड पद्धतीने आऊट केले होते. तो किस्सा सेहवागने शेअर केला आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या या फोटोला विरेंद्र सेहवाग याने एक मजेदार कॅप्शन देखील दिले आहे. आर अश्विन आता राजस्थान रॉयल्सकडून खेळणार आहे. आता त्याच्यासोबत जोस बटलर देखील असणार असे कॅप्शन त्याने दिले आहेत. पाहुयात काही निवडक मीम्स.
Haha Ashwin to Rajasthan. Will love him plotting a Mankad with Buttler.
— Virender Sehwag (@virendersehwag) February 12, 2022
Buttler when he sees Ashwin in the dressing room ??? pic.twitter.com/p4wjX3RyUt
— Adithya (@2109Adithya) February 12, 2022
— Hardik Ranjan (@hardikranjan127) February 12, 2022
— R K Rathoure (@r_k_rathoure) February 12, 2022
#ishankishan : इशान किशन ठरला महागडा खेळाडू, मीम्स शेयर करत चाहत्यांचा सोशल मीडियावर धुमाकूळ
Shocking sea water video : समुद्रातल्या पाण्यात Enjoy करत होते Ride, तेवढ्यात अचानक…
#IPLAuction : IPL 2022च्या लिलावात खेळाडूंवर पैशांचा तर सोशल मीडियात memesचा पाऊस, खळखळून हसाल