Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (27 फेब्रुवारी) त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सोशल मीडिया (Social media) स्टार टांझानियाच्या (Tanzania) किली पॉल आणि निमा पॉल या भावंडांचा उल्लेख केला. पीएम मोदींनी दोन्ही भावा-बहिणींचे जोरदार कौतुक केले. पीएम मोदी त्यांच्या कार्यक्रमात म्हणाले, ‘भारतीय संस्कृती आणि माझ्या परंपरेबद्दल बोलताना, आज मला तुमची दोन लोकांशी ओळख करून द्यायची आहे. आजकाल, टांझानियन भावंडं किली पॉल आणि निमा पॉल सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. तुम्हीही त्यांच्याबद्दल ऐकले असेल. त्याला भारतीय संगीताची आवड आहे आणि म्हणूनच ते खूप लोकप्रियही आहेत. पीएम मोदी म्हणाले, की मी दोन्ही भाऊ आणि बहिणींचे त्यांच्या अद्भुत सर्जनशीलतेबद्दल मनापासून कौतुक करतो. काही दिवसांपूर्वी दोघांनीही एका गाण्यावर लता दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली होती.
पीएम मोदी पुढे म्हणाले, ‘त्यांची लिप सिंक करण्याची पद्धत ते यासाठी किती मेहनत घेतात हे दर्शवते. अलीकडेच प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत गाताना त्यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.
काही दिवसांपूर्वी भारतीय दूतावासानेही टांझानियाच्या या भाऊ बहिणीचा गौरव केला होता. पीएम मोदी पुढे म्हणाले, ‘जर टांझानियातील किली आणि निमा भारताची गाणी अशा प्रकारे लिप सिंक करू शकतात, तर माझ्या देशात.. देशातील अनेक भाषांमध्ये.. अनेक प्रकारची गाणी आहेत. गुजराती मुले तमिळ गाण्यांवर व्हिडिओ बनवू शकतात का? केरळची मुलं आसामी गाण्यावर.. कन्नडच्या मुलांनी जम्मू-काश्मीरच्या गाण्यांवर व्हिडिओ बनवावे. ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ अनुभवता येईल असे वातावरण आपण निर्माण करू शकतो का?
पीएम मोदी म्हणाले, ‘आम्ही स्वातंत्र्याचा अमृतोत्सव नव्या पद्धतीने साजरा करू शकतो. मी तरुणांना आवाहन करतो, की त्यांनी यावे आणि भारतीय भाषांमधील लोकप्रिय गाण्यांचे त्यांच्या पद्धतीने व्हिडिओ बनवावे. तुम्ही खूप लोकप्रिय व्हाल. यामुळे देशातील विविधतेची ओळख नव्या पिढीला होईल.
तंजानिया के भाई-बहन किलि पॉल और उनकी बहन नीमा ये बहुत चर्चा में हैं और मुझे पक्का भरोसा है आपने भी उनके बारे में जरूर सुना होगा।
उनके अंदर भारतीय संगीत को लेकर एक जुनून है, एक दीवानगी है और इसी वजह से वे काफी लोकप्रिय भी हैं। #MannKiBaat pic.twitter.com/V7szK7KBit
— BJP (@BJP4India) February 27, 2022