पोहे म्हणजे सर्वात बकवास नाश्ता…,’ तरुणीच्या पोस्टवरुन सोशल मिडीयात हंगामा है क्यू बरपा

| Updated on: May 27, 2024 | 10:03 PM

भारतातील अनेक शहरात वेगवेगळे पदार्थ नाश्त्यात खाल्ले जातात. परंतू महाराष्ट्रात बहुतेक मध्यमवर्गीय कुटुंबात आठवड्यातून एकदा तरी पोह्यांची डीश तयार केली जातेच. काही वेळी तर कोणी पाहुणे आले तरी झटपट होणारी डीश म्हणून पोहेच सर्व्ह केले जातात. या कांदे पोह्यांवरुन सोशल मिडीयावर युद्ध छेडले गेले आहे....

पोहे म्हणजे सर्वात बकवास नाश्ता..., तरुणीच्या पोस्टवरुन सोशल मिडीयात हंगामा है क्यू बरपा
Poha is the worst breakfast
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

भारतात सकाळी नाश्त्यात कांदे पोहे खाणे हा मनपंसद फंडा असतो. लिंबू पिळून गरमागरम पोहे रिचविले की दुपारपर्यंत काही दुसरे खाण्याची गरजच रहात नाही. त्यामुळे कदाचित सकाळी कामाला जाताना मुंबईकर घाईघाईत पोहे आणि चहा असाच नाश्ता करीत असतात. पोहे शेंगदाणे घालून किंवा त्यावर शेव भुरभुरुन देखील खायला अनेकांना आवडत असते. वधुवर संशोधन सुरु असताना महाराष्ट्रात कांदे पोहे खायला देण्याची पद्धत असते. काहींना बटाटे पोहे आवडतात. महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर भागात पोह्यांबरोबर मिसळसोबत असते तशी लाल तिखट तर्री वाढली जाते. भोपाळ शहरात तर वाफेवरचे पोहे प्रचंड प्रसिद्ध आहेत. तेथे पोह्यांसोबत जिलेबी देखील खाल्ली जाते. अशा पोह्यांच्या नाश्त्याला एका तरुणीने सोशल मिडीयावर सर्वात बकवास नाश्ता म्हटल्याने तिच्या पोस्टवर पोहे प्रेमी चिडले आहेत.

मराठी घरात पोहे जसे सकाळचा नाश्ता म्हणून प्रसिद्ध आहेत. तसेच कर्नाटकात पोह्यांचे 21 प्रकार केले जातात असे प्रसिद्ध लेखिका आणि इन्फोसिसच्या सहसंस्थापक सुधा मूर्ती यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. कुणाल विजयकर यांनी घेतलेल्या या मुलाखतीत त्यांनी दडपे पोह्यापासून अनेक प्रकारच्या पोह्यांची रेसिपी सांगितली आहे. तर सोशल मिडीया प्लॅटफॉर्म एक्सवर मुस्कान नावाच्या एका युजरने पोह्यांच्या नाश्ताचा फोटो शेअर करीत त्यास याहून घटिया नाश्ता असू शकत नाही अशी पोस्ट केली आहे. त्यानंतर पोहे प्रेमींच्या प्रतिक्रियांचा अक्षरश: पाऊस पडला आहे. ही पोस्ट 7.48 लाख युजरनी पाहीली आहे. तर 2.9 हजार लोकांनी तिला शेअर केली आहे. युजर्सनी या पोस्टवर कमेंट करताना आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. अनेक लोकांनी या पोस्टला विरोध करीत आपले पोहे प्रेम व्यक्त केले आहे. तर काही तिची बाजू देखील घेतली आहे.

येथे पाहा ती पोस्ट –


एका युजरने म्हटले की, ‘मी  याच्याशी म्हटले आहे.’  तर अन्य एका युजरने लिहीलेय की, ‘हा खूपच चांगला आणि हेल्दी नाश्ता आहे. तर तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, ‘थोडी नारळाची चटणी मिक्स करा  म्हणजेच आणखी बेकार होईल. तर एका युजरने म्हटले आहे की ही डीश तुम्ही कशी तयार करता, यावर ते अवलंबून आहे. तर अन्य एका युजरने संताप व्यक्त करताना, ‘ हा पोह्यांच्या अपमान आणि शोषण आहे.’ अशी पोस्ट लिहीली आहे.